कारंजा (लाड) : दरवर्षीप्रमाणे यंदाही "श्रीक्षेत्र कारंजा(लाड)ते श्रीक्षेत्र धामणगाव (देव)" पर्यंतची,माऊली मुंगसाजी महाराजांच्या पादुकांची पालखी आनंद पदयात्रा रविवार दि. 07 जानेवारी 2024 रोजी श्रीक्षेत्र कारंजा येथून श्रीक्षेत्र धामणगाव (देव) च्या दिशेने निघणार असल्यामुळे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण आहे, दरवर्षी माऊली दर्शनाने कारंजेकर नववर्षातील धार्मिक शुभ कार्याचा प्रारंभ करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वारकर्यांनी पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सुरेश भाऊराव गढवाले यांनी केले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,सुमारे तेरा वर्षापूर्वी सन 2011 मध्ये, माऊलीचे सद्भक्त तथा दिंडी प्रमुख सुरेश भाऊराव गढवाले,सुनिल गुंठेवार,राजेंद्र चव्हाण,उमेश अनासाने, रामेश्वर खानबरड देविदास कव्हळे, हभप भगवानदास खेमवाणी, संजय महाराज कडोळे,उमेश माहितकर, सुनिल माकृलवार, शंकर संकेत,राम गटागट,राजाभाऊ शेळके,श्रीपाद रेवाळे,राहुल गायकवाड,अरविंद गुंठेवार, विजय पाटील खंडार,तायडे,शर्मा,नितीन गढवाले, योगेश गढवाले, रुपेश गढवाले व इतरांनी एकत्र येत माऊली पालखी सेवा समिती स्थापन करून, "श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव (देव)"पर्यंत,पालखी आनंद पदयात्रा सुरु केलेली होती.पहिल्या वर्षी केवळ सतरा वारकर्यांना सोबत घेऊन निघालेल्या रोपटयाचे (चिमुकल्या दिंडीचे) आज सन 2024 पर्यंत वटवृक्षात रूपांतर झाले आहे.आजमितीला या पदयात्रेत अडीच ते तीन हजार वारकरी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असतात.मध्यंतरी गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने कहर केल्यामुळे पदयात्रेत खंड पडण्याची भिती वाटत असतांना सुध्दा माऊली सेवा समितीच्या वारकर्यांनी सुरु केलेली पालखी पदयात्रा खंडीत न होऊ देता निवडक वारकरी घेऊन, प्रशासनाच्या अनुमतीने सुरुच ठेवली होती.हे विशेष! मागील वर्षीच्या 2023 पासून मात्र पालखी आनंद पदयात्रा वारी मोठया जल्लोषात निघत आहेत, यावर्षी सदर्हू ,वाशिम जिल्ह्यातील कारंजा(लाड)तालुक्यातील स्थानिक पहाडपुरा,टिळक चौक,कारंजा येथून माऊली सेवा समितीची ही पालखी पदयात्रा रविवार दि 7 जानेवारी रोजी, सकाळी 08: 30 वाजता धामणगाव ( देव) करीता पायदळ निघणार असून, प्रमुख परिक्रमा मार्गाने,टिळक चौक,श्री.मोठे राममंदिर श्रीरामनगर,श्री.दत्त मंदिर,श्री.शनि महाराज मंदिर,रामा सावजी चौक,श्री. गुरुमंदिर संस्थान,श्री.संत नामदेव महाराज मंदिर कानडी पुरा,अमोल सुरेश गढवाले यांचे निवास येथून कुंभारपूरा मार्गाने,दारव्हावेसी मधून गावा बाहेर पडून,श्रीक्षेत्र धामणगाव देव करीता रवाना होणार असून, मार्गात सोमठाणा,कामठवाडा, सांगवी रेल्वे,श्री सिद्ध रामनाथ स्वामी मठ संस्थान,रामगाव ( रामेश्वर ),येथून बोदेगाव येथे , माऊलीभक्त गजानन सुपलकर ( गोंधळी) वारकरी यांचेकडून दुपारची महाप्रसाद व्यवस्था राहील . त्याशिवाय मार्गात ठिकठिकाणी स्थानिक माऊली भक्त मंडळी चहापान अल्पोपहार व्यवस्था करणार असून श्रीक्षेत्र धामणगाव (देव) येथे पोहचल्यावर माऊली दर्शन महाआरती व महाप्रसाद घेऊन पालखी आनंद पदयात्रेचा समारोप होईल. तसेच दुसरे दिवशी 08 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता, माऊली सेवा समितिचे पालखी प्रमुख सुरेश भाऊराव गढवाले, पहाडपुरा यांचे निवासस्थानी माऊली भक्तांकरीता दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.असे वृत्त गढवाले परिवाराकडून कळविण्यात आल्याचे माऊली सेवा समितीचे स्वयंसेवक संजय कडोळे यांनी कळवीले असून,जास्तीतजास्त माऊली भक्त वारकरी यांनी पालखी आनंद पदयात्रेत शांती,संयम,श्रद्धा ठेवून स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी होण्याचे आवाहन,भाविकांकरीता केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....