कारंजा. तालुक्यात जवळच असलेल्या मौजे दुघोरा येथे दिनांक १३ मे रोजी संध्याकाळी सहा वाजता खरीप हंगाम सभा घेण्यात आली यामध्ये दुघोरा येथील कार्यरत असलेले कृषी सहायक प्रेमानद राऊत यांनी शेतकऱ्याला मार्गदर्शन करताना शेती कशी करायची तसेच प्रत्येक शेतामध्ये एकरी एक जलतारा या योजना शासनामार्फत घेऊन जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाळवावी जेणेकरून रब्बी हंगामामध्ये आपणाला रब्बीचे हंगाम पीक घेण्याकरता मदत होईल याकरीता शासनाकडून मरेगाअंतर्गत लागलेला जलतारेला खर्च देण्यात येत आहे तसेच खरीप हंगामामध्ये आपण स्वतःच्या घरीच बीज तयार करून रासायनिक खताचा वापर न करता जैविक खते वापरून तसेच फवारण्या करून शेतीची सुपीकता वाढवावी असे मार्गदर्शन कृषि सहाय्यक यांनी केले. या वेळी दुघोरा गावामधील शंभर ते दीडशे शेतकऱ्यांनी सभेला हजेरी लावली गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी रोजगार सेवक हजर होते.सभा विठ्ठल मंदिर देवस्थान मधील सभागृहामध्ये घेण्यात आली कृषि सहाय्यक राऊत हे वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात याबाबतीत दुधोरा येथील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण तयार झालेले दिसले अशी माहिती ग्रामीण पत्रकार ब्रह्मदेव पाटील बांडे यांनी दिली