सेल्फ डिफेंस का मतलब है खुद की, या किसी और की, या अपनी संपत्ति की रक्षा के लिए उचित बल का प्रयोग करना, जब कोई खतरा महसूस हो. यह एक कानूनी औचित्य है, जिसका उपयोग व्यक्ति खुद को या दूसरों को चोट या नुकसान से बचाने के लिए कर सकता है.*
*सध्या सर्विकडे उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत काही शाळा विविध शिबिर घेऊन मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे तर काही शाळा बंद असून मुलं मोकळी फिरत आहे . अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील 365 दिवस चालणारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह तेथे नियमित शाळा सुरू असून त्यात विद्यार्थ्यांचा शारीरिक ,मानसिक ,बौद्धिक तथा कलात्मक विकास साधला जात आहे.नवोदय सारखे विषयाची तयारी मुलांकडून करून घेतली जात आहे. त्यातच मुलांना कराटे व सेल्फ डिफेन्स सारख्या विषयाचे धडे मुलांना दिले जात आहे.श्री कुंदन पेंदोर सर जे डब्बल ब्लॅक बेल्ट असून ते कराटे प्रशिक्षण वर्ग चालवता त्यांनी नॅशनल गोल्ड मेडल व इंटर नॅशनल स्तरावर पदक मिळवले आहे. त्यांनी या शाळेत येऊन मुलांना कराटे व सेल्फ डिफेन्स विषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले.*
*या एकदिवसीय कार्यशाळेसाठी हजर झाल्यामुळे इयत्ता 10 वी च्या मुलींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोबत शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुध्दा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. शाळेतील मुली व मुलांना घेऊन बचाव कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यात दीव्यंका बाजगीर ,वैष्णवी इंडले, सोहम वाघमारे,शिवम सोडणर ,सूरज कणकावरे या मुलांनी यात सहभाग घेतला. इयत्ता १ ली ते इयत्ता १० पर्यंतच्या मुलामुलींनी यात आपला सहभाग घेतला. या प्रशिक्षण वर्गाला शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र परतेकी सर हजर राहून श्री कुंदन पेंदोर सर यांचे आभार मानले.*