संजय कडोळे यांनी,तेरवी प्रथेचा विरोधाचा टोकाचा निर्णय प्रशंसनिय." -अमोल अघम.
कारंजा (लाड): एखाद्याचे कुटुंबात कुटुंबातील व्यक्तिच्या निधनामुळे शोकाकूल वातावरण असते.खरे तर त्यांचे अख्ये कुटूंब दुःखसागरात बुडालेले असते.परंतु अशा कुटुंबाला आधार देणे गरजेचे असतांना त्यांचेकडून तेरवी,चौदावी,गोडजेवणं अशा प्रकारच्या जेवणावळ्याची अपेक्षा केल्या जाते.अनेक कुटुंबात तर शोकाकुल व्यक्तींना पेढे भरवून त्यांचा कडूघास काढण्याची वाईट अशी कुप्रथा आहे.परंतु हा चुकीचा पायंडा मोडलाच पाहीजे.मृत्युनंतर जेवणावळ्या करण्यापेक्षा गरजूंना जीवंतपणी पोटभर अन्न मिळाले पाहिजे.एखाद्याला मृत्युनंतर खांदा देण्यापेक्षा गरजवंत अनाथ, निराधार,वयोवृद्धांना जीवंतपणी आधार दिला पाहिजे.या उदात्त हेतूने सेवाभावी कार्य करणाऱ्या,दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी टोकाचा निर्णय घेऊन,आपले लहान बंधू स्व.उमेश मधुकरराव कडोळे यांच्या आकस्मिक मृत्युनंतर तेरवीच्या फालतू खर्चाला फाटा देवून,तेरवीच्या जेवणावळ्या न करता "फुल नाही तर फुलाची पाकळी" म्हणून आपल्या बेताच्या आर्थिक परिस्थिती नुसार, खारीचा वाटा म्हणून अल्पशी का होईना ? परंतु थोडीफार मदत, गरजवंत,अनाथ, निराधार, वयोवृद्ध लोकांच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या "एक ऊब जाणीवेची" या संस्थेला देवून समाजात नवा पायंडा पाडल्याचे, स्थानिक श्रीराम व्यायाम मंडळ कारंजाचे अध्यक्ष तथा दैनिक मातृभूमिचे पत्रकार अमोल पाटील अघम यांनी म्हटले असून संजय कडोळे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच यावर अधिक भाष्य करतांना त्यांनी सांगीतले की, "एक ऊब जाणीवेची" ही सेवाभावी संस्था खरोखर गरजवंत असणाऱ्या,अनाथ, निराधार,बेघर,दिव्यांग,दुर्धर आजारग्रस्त,वयोवृद्ध गरजू लोकांना दोन वेळा पोटभर भोजन मिळावे.या उदात्त हेतूने निःस्वार्थ कार्य करीत असून, समाजातील जास्तित जास्त लोकांनी "एक ऊब जाणीवेची" संस्थेच्या माध्यमातून गरजवंताला मदत करण्यासाठी संस्थेला, तन मन धनाने सहकार्य करून गरजवंताच्या अश्रूंची जाणीव ठेवली पाहीजे.