कारंजा - दिनांक 13 ते 20 जानेवारी 2024 रोजी भारतीय जनता पार्टी कारंजा मानोरा मतदार संघाचे वतीने मतदार संघातील कारंजा मानोरा तालुक्यातील युवकांच्या कला क्रीडागुणांना वाव मिळावा या करीता भारतीय जनता पार्टीच्या वतीने नमो चषक २०२४ चे आयोजन केले आहे. भारतीय जनता पार्टी द्वारा "नमो चषक" भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघाचे आमदार माननीय श्री राजेंद्र पाटणी साहेब यांचे शुभ हस्ते क्रिडा संकुल, बायपास, कारंजा येथे कबड्डीच्या सामन्याने होणार असून कार्यक्रमात मान्यवर तज्ञ प्रशिक्षक, जिल्हा भाजपा क्रिडा संयोजक, भाजपा जिल्हा सांस्कृतिक सेल अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दिनांक 13 ते 20 जानेवारी 2024या कालावधीत वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात विविध क्रीडांगणांवर होणार आहेत. स्पर्धेत कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल , खो खो, बॅटमिंटन, बुध्दीबळ, कॅरम, मॅरेथॉन, रनिंग,सांस्कृतिक स्पर्धा चित्रकला,रांगोळी, वकृत्व , नृत्य इत्यादी कला,क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. विजेत्या खेळाडूना आकर्षक बक्षिसे तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत सहभागासाठी स्पर्धक,खेळाडू संघ यांनी पूर्वनोंदनी साठी https://namochashak.in/
या लिंकवर नोंदणी करावी.
10 जानेवारी पर्यंत स्पर्धकांनी नोंदणी करावी. दिनांक 13 जानेवारी रोजी 67किलो आतील गटातील कबड्डीच्या दणदणीत सामने सायं.5 वाजता सुरू होणार आहेत. दिनांक 14जानेवारी रोजी क्रिकेटच्या खेळांना सुरुवात होणार आहे तसेच मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. दिनांक 14आणि दिनांक 15 रोजी बॅटमिंटन, दिनांक 16 ते 17 बुद्धिबळ, दिनांक 16,17 रोजी रनींग 100 आणि 400 मीटर, दिनांक 18,19 रोजी कॅरम, खो खो, दिनांक 19,20 रोजी हॉलिबॉल. दिनांक 16,17 जानेवारी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहे. तरी कारंजा मानोरा तालुक्यातील खेळाडूंनी, स्पर्धकांनी, खेळाडू संघांनी आपली नोंदनी उपरोक्त लिंकवर करावी व या भव्य स्वरूपात होणाऱ्या स्पर्धामधे भाग घ्यावा. असे आवाहन भाजपा कारंजा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, भाजपा मानोरा तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हान,भाजपा कारंजा शहर अध्यक्ष ललित चांडक, भाजपा मानोरा शहर अध्यक्ष राजुभाऊ देशमुख, भाजपा जिल्हा क्रिडा सेल संयोजक राजेश शेंडेकर सर, भाजपा जिल्हा सांकृतिक सेल गिरीश जिचकार सर यांनी केले आहे. कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी क्रिडा व कला क्षेत्रातील अनेक तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शक यांचे सहकार्य लाभत असुन ते सर्व विशेष परिश्रम घेत आहे.तालुक्यातील व शहारातील सर्व भाजपा सेल, आघाड्या, युवा मोर्चा, महिला मोर्चा पदाधिकारी या कार्यक्रमांचे यशस्वीतेकरीता प्रत्यक्ष सहभागी होवुन कार्य करीत आहे.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....