चुकीच्या शासन निर्णयास तात्काळ विरोध करा- डाॅ. स्मिता मेहेत्रे नागपूर यांचे (गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेतर्फे व इतर सामाजीक संघटनांच्या सहकार्याने आयोजीत 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतीदिनी-शिक्षक दिन कार्यक्रमात बोलतांना हल्लाबोल केले* उद्घाटनीय मनोगत व्यक्त करतांना शासन प्रायोजीत सांस्कृतीक दहशतवादावर प्रहार केला.
महापुरुषास प्रबोधनपर आदरांजली वाहुन मार्गदर्शकांनी उपस्थितांना खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले.
1) डाॅ.प्रेमकुमार खोब्रागडे, सिंदेवाही = बाबासाहेबांनी फुलेंना गुरु का मानले हे ग्रामिण भाषेत अनेक उदाहरणाने पटवुन दिले. तसेच हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.
2) प्रा.संजय मगर, ब्रम्हपूरी = सामाजीक शत्रुंचे कारस्थान समजुनही त्याविरुध्द कृती न करणे हे महात्मा फुले व सर्व महापुरुषांच्या शिकवणुकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार आहे असे परखड मत मांडून उपस्थित जनतेचे कान टोचले.
3) कार्यक्रम अध्यक्ष भिमराज पात्रीकर = सांस्कृतीक लकव्यातुन बाहेर पडल्याशिवाय आर्थिक सक्षमतेसाठी धडपड अशक्य.
दरवर्षी प्रमाणे लोकजागृती घडवुन समाज प्रबोधन करणा-या मान्यवरांचा *महात्मा फुले - समाज शिक्षक पुरस्कार* देऊन गौरव करण्यात येत असतो. यावर्षी देवसाय आतला मोहगाव-पेंढरी व रसिकाताई गावतुरे बेळगावघाट-कोरची यांचा सत्कार करण्यात आला. कु.छकुली गुरनुले दिभना हिने अप्रतिम अशी मी सावित्री फुले बोलतेय ही एकांकीका सादर केली. संविधानाचे रक्षण करण्यासाठी कटिबध्द असल्याची शपथ घेऊन प्रास्ताविकेचे सामुहीक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र आदे व प्रास्ताविक अशोक मांदाडे यांनी केले. आभार उमेश जेंगठे यांनी मानले व फोटोग्राफीची जबाबदारी देवा फोटो स्टुडीयो यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संघटनांच्या पदाधीका-यांनी प्रयत्न केले. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असतांनासुध्दा जिल्ह्यातील व बाहेरील सर्वजातीय बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उपस्थितांच्या स्नेहभोजनाची सोय यांनी केली होती.