नागभिड: तालुक्यातील सावरगाव बस स्टॉप वरून आई वडिलांसोबत फिरायला निघालेल्या एका सात वर्षीय मुलाला मद्यधुंद अवस्थेत दोन दुचाकी स्वारांनी दिली धडक. यात मुलाचा पाय तुटला तर डोक्याला गंभीर दुखापत झाली.. मुलाला तात्काळ तळोधी बा. ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर दुचाकीस्वार पैकी एकाला लोकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र दुसरा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. सुमेध चंदू मेश्राम, वय सात वर्षे हा मुलगा जेवणानंतर आपल्या आई-वडिलांसोबत रस्त्याच्या कडेने फिरायला निघाले असताना. तळोधी कडून पळसगाव जाट कडे जाणाऱ्या पळसगाव निवासी चालक सचिन सुकरु मारभते (३०) व रामभाऊ ईश्वर मेश्राम (३०) दोन मदधुंद युवकांनी आपल्या दुचाकी क्रमांक *MH 34- BM +7724* ने त्याला समोरासमोर धडक दिली त्यानंतर रस्त्याच्या कडेला गंभीर स्थितीत पडलेल्या सुमेध ला उचलून तात्काळ तळोधी बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार देण्यात आले तिथे त्याला त्याच्या डोक्याला २५ टाके लावून त्याच्या प्रथमोपचार करण्यात आला. व नंतर ब्रह्मपुरी येथे समोरील उपचाराकरिता पाठविण्यात आले. मात्र इकडे दुचाकीने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वाराचा संतुलन जाऊन रस्त्यावर पडला आहे त्यानंतर दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाला पकडून लोकांनी चांगलाच चोप दिला. दुचाकी चालक दोन्ही युवक हे पळसगाव जाट येथील निवासी असल्याचे समजले. त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार गुप्ता मेजर हे करीत आहेत.