ब्रह्मपुरी शहरात उन्हाळ्यात सामान्य माणसाची पाण्यासाठी वण वण भटकंती होत असते.तर मुक्या पाखरांना ही पाण्याची गरज असते उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने व पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने पशुपक्ष्यांनी गावाकडे धाव घेतली आहे.
ब्रम्हापुरी येथील बालगोपालांनी आपल्या छोट्या वयात पाखरासाठी घरासमोर असलेल्या झाडाला पानपोई बसवली, येथे परिसरातील पाखरे पाणी पिवून आपली तहान भागवत आहे. या बालकांनी राबवलेल्या उपक्रमाची सर्व परिसरात कौतुक केले जात आहे. या उपक्रमासाठी. दर्पण देशमुख, उत्कर्ष देशमुख, ओम खेडेकर, निर्मित भोयर, व अन्य बालगोपालांनी परिश्रम घेतले आहे.