कारंजा (लाड) : झाडीपट्टी रंगभूमीच्या गद्दार या नाट्यप्रयोगासाठी कारंजा शहरातील श्री बालाजी संस्थान माळीपूरा येथे आलेल्या अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष तथा झाडीपट्टी रंगभूमीचे नाट्यसम्राट नरेश गडेकर, अभिनेत्री आसावरी तिडके यांनी दि. 07 डिसेंबर 2023 च्या आठवणींना उजाळा देत, शुक्रवारच्या सकाळी संजय कडोळे यांना भेटीसाठी आवर्जून बोलवीले.यावेळी त्यांनी संजय कडोळे,प्रसन्न पळसकर, नंदकिशोर कव्हळकर, आनंद खेडकर व कारंजेकरांशी मनसोक्त हितगुज केले.उल्लेखनिय म्हणजे मागील वर्षी विदर्भ लोककलावंत संघटना आणि संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख संजय कडोळे आणि नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य नंदकिशोर कव्हळकर यांनी,श्री एकवीरा माता संस्थान येथे नटसम्राट अभिनेते नरेश गडेकर, अभिनेत्री आसावरी तिडके यांचे उपस्थितीत राज्यस्तरीय लोककलावंत मेळावा आयोजीत केला होता.या मेळाव्याला दिवंगत आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांनी आजारी असतांनाही तिन तास पर्यंत न भुतो न भविष्यती अशा प्रकारची उपस्थिती दिली होती. यावेळी शिक्षक आमदार अँड. किरणराव सरनाईक, स्वागताध्यक्ष जयकिसन राठोड हे देखील या मेळाव्याला उपस्थित होते. व पुढे त्यांनी सरकार दरबारी लक्ष्यवेधी मांडून संजय कडोळे यांच्या लोककलावंताच्या मानधन वाढीची मागणी रेटून धरली. त्यामुळे आज रोजी लोककलावंताना दरमहा जी 5000 Rs मानधन वाढ मिळाली.ती ह्या कार्यक्रमाचे आणि दि. 24 जानेवारी 2024 च्या वाशिम येथील लोककलावंताच्या धरणे आंदोलनाचे फलित मानले जाते.या विषयावर सुद्धा चर्चा होऊन झाडीपट्टी रंगभूमीच्या अभिनेते नरेश गडेकर, अभिनेत्री आसावरी गडेकर व अन्य कलाकारांनी संजय कडोळे, नंदकिशोर कव्हळकर यांचे अभिनंदन केले.