कारंजा लाड : अमरावती ते किल्लेधारूर या एस टी बस मध्ये अमरावती ते कारंजा (लाड) अश्या प्रवासाकरिता दि १२/११/२०२२ रोजी सकाळी, जे डी चवरे विद्या मंदिरचे माजी प्राचार्य प्रा .अविनाश मुधोळकर यांचा मुलगा अभिजित अविनाश मुधोळकर हा प्रवास करीत असतांना ,तो कारंजा आल्यानंतर येथे उतरला परंतु त्याचे महत्वाच्या शालेय कागदपत्राचे पॉकिट त्या बसमध्ये तो बसलेला होता . तेथेच विसरून गेला . त्यानंतर तो घरी पोहोचला आणि मस्तपैकी आराम करू लागला . तरीदेखील आपली महत्वाची कागदपत्रे हरविले असल्याची त्याला कल्पना सुध्दा नव्हती. की आपले संपुर्ण महत्वाचे दस्तऐवज असलेले पॉकीट हरवले आहे. तर इकडे कारंजाहून पुढील प्रवासाकरीता, दुसरीकडे कारंजा ते वाशिम प्रवास करणारे जग्गु उर्फ प्रशांत कुऱ्हे हा त्या बसमध्ये चढला तेव्हा त्याला बसमध्ये सिटवर बसत असताना त्यांला ते पॉकीट मिळाले तेव्हा त्याने तात्काळ बसच्या वाहक व चालक बाळासाहेब तोंडे व शिंगारे यांना माहिती देऊन त्यांच्या समक्ष ते पॉकीट उघडले असता त्यामध्ये कारंज्याच्या व्यक्तीचे महत्वाचे कागदपत्र असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने कारंजाचे सासचे श्यामभाऊ सवाई संस्थापक (अध्यक्ष) सर्वधर्म मित्र मंडळ यांच्या सास कंट्रोल रूमला फोन करूण माहिती दिली आणि जग्गु उर्फ प्रशांत कुऱ्हे यांच्या व्दारे प्राप्त माहितीच्या आधारे वन सेंकद वन कॉल न्यु लाईफ अभियान सास शोध व बचाव पथकाच्या कार्यप्रणाली प्रमाणे श्याम सवाई यांनी सदर अभिजित मूधोळकर यांना तूमचे पॉकीट मिळाले आहे.असे कळविले. तेव्हा अभिजितच्या आपले महत्वाचे कागदपत्र हरवीले होते परंतु आपल्याला कळलेही नाही परंतु मिळाले असल्याचे कळल्याने त्याचा जीव भांड्यात पडला . पण लगेच मन हलके झाले. व कारंजाच्या एका युवकाला कारंज्याच्या प्रामाणिक मानवतेचे दर्शन देणारे जग्गु उर्फ प्रशांत कुऱ्हे यांनी कारंजा परत आल्यानंतर, श्यामभाऊ सवाई यांच्या उपस्थितीमध्ये सापडलेले महत्वाचे दस्तऐवज असलेले पॉकीट परत केले हे कागदपत्र हरवले असते तर डुलिकेट तयार करायला मला खुपच मानसिक व आर्थिक त्रास झाला असता . व बराच वेळ गेला असता, असे मत अभिजितने व्यक्त केले. आणि एस टी कर्मचारी तथा जग्गु उर्फ प्रशांत कुऱ्हे आणि सासचे श्याम सवाई यांचे आभार मानले. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला मिळाले असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले.