कारंजा (लाड) : कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेचे उपाध्यक्ष उमेश हरिभाऊ अनासाने हे बालपणा पासूनच विविधांगी समाजसेवेत सक्रिय असतात. विश्व हिंदु परिषदेकडून काढण्यात आलेल्या कारसेवेत आणि अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी आंदोलनात सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता.
तसेच ते राष्ट्रसंत कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या स्वच्छतेचे महामंत्राचे महत्व जाणून स्वच्छता उपक्रमातही हिरीरीने सहभागी होत असतात. त्याबद्दल त्यांना अनेक राज्यस्तरिय पुरस्कारही मिळाले आहेत.नुकतेच दि. 23 व 24 डिसेंबर रोजी मुंबई येथे घेण्यात आलेल्या कर्मयोगी संत गाडगेबाबा पुण्यतीथी समारोहात त्यांना प्रमुख स्वच्छतादूत म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी स्वतः साफसफाई करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्याकरीता त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.