पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक श्री प्रफुल्ल संघवी यांनी सामाजिक कार्यामार्फत अनेक चांगले उपक्रम राबवलेले असून त्यांची अनेख विविध पदावर त्यांची नियुक्ती असून महावीर पतपेढी या पतसंस्थेवर त्यांची संचालक म्हणून नियुक्ती असून M.S.P.बिल्डकॉन च्या संचालक पदी असून साई इन्फ्रा संचालक तसेच त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी पाहून जैन समाजातर्फे त्यांची जैन पाठशाळा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे
शतकीय दैदिप्यमान गौरवशाली परंपरा लाभलेल्या दानशुरु शेट श्री.बछराजजी रुपचंदजी संघवी जैन पाठशाळा, पाचोरा या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी एमएसपी बिल्डकॉनचे तसेच साई इन्फ्राचे संचालक प्रफुल्लकुमार उर्फ पप्पू भाऊ जवाहरलाल संघवी यांची दिनांक एक जून रोजी झालेल्या संस्थेच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पाचोरा जैन समाजाचे प्रमुख व्यक्तिमत्त्व रतनचंदजी संघवी, डॉ. जवाहरजी संघवी, किशोरजी संघवी, माजी अध्यक्ष बबलू संघवी,महेंद्र शेठ संचेती, कांतीलालजी जैन,जीवन जैन, प्रफुल्लजी बांठीया, दिनेश बोथरा, मिलिंद संघवी, नितीन संघवी, प्रदीप कुमार संघवी यांच्यासह समाजातील सर्व बांधव उपस्थित होते. या निवडीबद्दल प्रफुल्ल कुमार संघवी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांचे उल्लेखनीय काम असून पाचोरा तालुक्यासह जिल्ह्यात त्यांच्या नावाचा गवगवा असून संघवी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्ये नव्या उंचीवर पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.