वाशिम : महाराष्ट्र राज्यातील, दिव्यांगाच्या एकूण एकवीस प्रकारातील दिव्यांगाचे सर्व्हेक्षण करून नेमकी आकडेवारी (जनगणणा) जाणून घेऊन, त्यांच्या करीता शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यवसाय, अर्थसहाय्य इत्यादी योजना दिव्यांग मंत्रालयाकडून राबविण्याकरीता प्रथमच "महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग, शासन निर्णय क्रं . २०२४ / प्र.क्र.३६ दिव्यांग कल्याण ३ दि १६ मार्च २०२४" ह्या शासन आदेशाद्वारे महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत द्वारे, लवकरच सकल दिव्यांगाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, शासन दिव्यांगाची नेमकी आकडेवारी उपलब्ध करून घेणार आहे त्याकरीता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते व सचिव म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रमुख राहणार असून, महानगर पालिका,नगर परिषद , पंचायत समिती स्तरावर सुद्धा शासकिय समित्या राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामिण विभागात आशा गट, महिला बचत गड, आशासेविका व अंगणवाडी सेविकेकडून आणि शहरी विभागात कर्मचाऱ्याकडून सर्व्हेक्षण करून नेमकी आकडेवारी उपलब्ध करून गावपातळीवर दिव्यांगाच्या माहितीचे दफ्तर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आणि शासन आदेश महाराष्ट्र अपंग संस्था कारंजा यांचेकडे प्राप्त झाला असून या आकडेवारी नंतर दिव्यांगाना योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांगाचे पालक,आईवडिल,भाऊ यांनी सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तिला दिव्यांगाची संपूर्ण माहिती देण्याची व्यवस्था करावी.असे आवाहन दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी दिव्यांगा बंधू भगीनिकरीता केले आहे.