विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या,कापूस चळवळीचे प्रणेते,कृषी,सहकार,शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य नेते,दि.अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बँकेच्या प्रगतीचे शिल्पकार,सहकार महर्षी कै.डॉ.वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त,जन्मशताब्दी वर्ष महोत्सव शुभारंभाचे भव्य आयोजन,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीधरजी पाटील कानकिरड उपाध्यक्ष,दि.अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अकोला यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष मा नरेंद्रजी संपतलाल गोलेच्छा,माजी नगराध्यक्ष मा.अरविंदजी मनसुखलाल लाठीया,ज्येष्ठ कार्यकर्ते मा.तुळशीरामजी रुपचंद मुंधरे,बँकेचे मा.संचालक मा. प्रभाकरजी परशराम वानखडे यांची प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेले असून,सदर्हू कार्यक्रमाला आपल्या तालुक्यातील सर्व मान्यवर,शेतकरी,बॅकेचे ग्राहक यांनी या समारंभाला, बुधवार दि . ३ मे २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता, दि.अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि अकोलाच्या कारंजा येथील मुख्य शाखेल उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन,मंगेश काळे (मार्केटिंग ऑफिसर ग्रेड १) कारंजा आणि दत्तात्रय चौधरी शाखाधिकारी मुख्य शाखा कारंजा यांनी केले आहे.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.