कोरची तालुक्यातील कोचीनारा येथील आरोपी पती प्रीतराम धकाते यांनी कुन्हाडीने आपल्या पत्नीची जंगलात हत्या केली होती. तसेच बचावासाठी गेलेल्या मुलीचा हाथ सुद्धा फ्रैक्चर केले होते. गोपनीय माहितीच्या आधारे मथुरा येथे साधूची वेशभूषा परिधान करून राहत असल्याची माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरक्षक गणेश यांनी आपल्या सोबत ३ सहकाऱ्यांना घेऊन मथुरा गाठले. आरोपिला शोधताना त्याला याची कल्पना होता कामा नये म्हणून पोलीस निरीक्षक यांनी साधूचे वेश परिधान करून व सापळा रचून प्रीतराम याला मथुरा येथे ५ दिवसानंतर पकडले.