कारंजा : स्थानिक शहर पोलिस स्टेशनला कोव्हिड 19 कोरोना महामारीत, जीवाची पर्वा न करता सतत चोवीस तास तन मन धनाने , नागरिकांना व बाहेर गावच्या स्थलांतरीत मजूरांना सेवा देणारे त्यांच्या रुग्नालय, भोजन व परतीच्या प्रवासाला मदत करणारे पोलिस हवालदार गजाननराव ढिसले यांना सन २०२० -२१ मध्ये महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदने, "कोरोना योद्धा पुरस्कार" दिलेला होता. नंतर त्यांचे स्थानिक ग्रामिण पोलीस स्टेशनला स्थानांतर झाले होते. पुढे त्यांच्या कर्तव्यदक्ष,प्रामाणिक सेवेची दखल पोलिस विभागाने घेऊन, त्यांना "पोलिस उपनिरिक्षक" म्हणून बढती देऊन ग्रामिण पोलिस स्टेशनलाच नियुक्ती देण्यात आली. त्याबद्दल, शुक्रवार दि.५ ऑगष्ट रोजी स्थानिक महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, साप्ता नाथांजलीचे संपादक एकनाथ पवार, स्वराज्य टिव्ही चॅनल्सचे जि.प्र. विजय पाटील खंडार, साप्ता कारंजा भूमिचे उपसंपादक मोहम्मद मुन्निवाले, साप्ताहिक युवा प्रेरणाचे संपादक गणेश बागडे, पत्रकार आशिष धोंगडे इ नी पुष्पगुच्छ देवून, गजानन ढिसले यांचे स्वागत परअभिनंदन केले आहे. तसेच कारंजा शहर पोलिस स्टेशनला आपली नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.