आरमोरी तालुका येथे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 या कायद्याविषयी जनजागृती व्हावी या व्यापक उद्देशाने अभय केंद्र आरमोरीच्या च्या विद्यमानाने आज दिनांक 01/03/2024 रोजी वैरागड येथील ग्राम पंचायत समाज भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती एम. बी. साठवने संरक्षण अधिकारी अभय केंद्र आरमोरी यांनी मा. प्रकाश भांदककर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात केले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन दीप प्रज्वलन व सावत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मा. श्री गणेश कुकडे बालविकास प्रकल्प अधिकारी यानी उदघाटन केले. मार्गदर्शक अँड उमेश कुकुडकर, रुपाली काळे मॅडम संरक्षण अधिकारी गडचिरोली, तनोज ढवगाये सामाजिक कार्यकर्ता बालसंरक्षण कक्ष गडचिरोली , पुरुषोत्तम मुजुमदार संरक्षण अधिकारी गडचिरोली ग्रामीण यांनी कायद्याविषयी मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोरखनाथ भानारकर पो.पा. वैरागड, संगीता पेंदाम सरपंच वैरागड, कुसुम तितिरमारे, निशिगंधा झुर्रे पर्यवेक्षिका आरमोरी हे उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणातून श्रीमती एम. बी.साठवने संरक्षण अधिकारी आरमोरी यानी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 च्या कायद्याची माहिती दिली व पिढीत महिलांना अभय केंद्र आरमोरी या कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे आव्हान केले . आभार प्रदर्शन अलका लाउतकर अंगणवाडी सेविका वैरागड यांनी केले.