कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : आपला समाज हा केवळ आणि केवळ संधिसाधू स्वार्थी व्यक्तींनी बरबटलेला असतो.हे वास्तव आहे.या समाजातील संधीसाधू मध्यमवर्गीय व्यक्ती ह्या त्यांच्या राजकिय, सामाजिक,कला,क्रिडा,नाट्य क्षेत्रातील त्यांच्या यशस्वीतेकरीता आणि स्वतःच्या प्रतिष्ठेकरीता, सभोवतालच्या समाजातील तळागाळातील व्यक्तींना आपले कार्यकर्ते म्हणून राबवून घेत असतात.तळागाळातील व्यक्तींच्या भांडवलावरच ही मध्यमवर्गीय व्यक्ती मोठ्या होतात.मात्र त्यांच्या प्रती जीवापाड मैत्री,अतोनात श्रद्धा व अतिविश्वास ठेवणाऱ्या तळागाळातील व्यक्तींचे हे नेते एकदा का त्यांना प्रसिद्धी मिळाली की,मग मात्र स्वतःचा स्वार्थ साध्य करून,ह्या संधीसाधू व्यक्ती त्यांचे जीवन घडविणाऱ्या,त्यांच्या सभोवतालच्या आणि जीवावर जीव देणाऱ्या तळागाळातील व्यक्तींना पार विसरून जातात.मग मात्र त्यांची ऊठबस सेलिब्रेटीमध्ये सुरु होते. व पुढे हे मध्यमवर्गीय त्यांचे जीवन घडविणाऱ्या तळागाळातील व्यक्तींपासून पुढे निघून जातात. त्यांचा स्वार्थ साध्य होताच "गरज सरो वैद्य मरो." ह्या उक्तीप्रमाणे तळागाळातील व्यक्तींसोबतचे ऋणानुबंधही विसरून जातात. म्हणजेच गरीबगुदांच्या अथक आणि १००% मोफत मिळणाऱ्या संगतीतून प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर ते तळागाळातील जुन्या सहकाऱ्यांना अक्षरशः झटकून देतात.आणि मग तळागाळातील त्यांच्याच कार्यकर्त्यांना यांच्या स्वार्थी स्वभावाची जाणीव होऊन त्यांच्या दुःखी हृदयाचा तळतळाट होत असतो.परंतु एवढं सगळं होऊनही तळागाळातील गरीब व्यक्ती मात्र स्वतःच्याच घायाळ मनाची समजूत काढून,यापूढे मैत्रीचा विश्वासघात करणाऱ्या राजकिय प्रसिद्धीपिसाटाचा चांगलाच अनुभव गाठीशी बांधून, पुढे यांच्याशी संबध न ठेवता स्वतः जातीने यांच्या पासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेत असतो. (संदर्भ : सत्य अनुभवाचा आधार.)