कारंजा : स्थानिक महात्मा फुले चौक परिसरात वास्तव्यास असलेले नगर परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकरराव सिताराम ठाकरे (वय : ८८) यांनी उत्तम रितीने आपल्या परिवाराची काळजी वाहून,आपल्या ज्ञानदानातून त्यांच्या कारकिर्दीत कित्येक विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचे भाग्य मिळवीले. त्यासोबतच सकाळी काकड आरती,सांयकाळी हरिपाठ, किर्तन,प्रवचन ऐकण्याचा छंद त्यांनी आयुष्यभर जोपासला होता.पंचक्रोशितील संत गजानन महाराज मंदिर,श्री कामाक्षा मंदिर आणि श्री गुरुमंदिरच्या उत्सवात ते हिरीरीने सेवाधारी म्हणून भाग घ्यायचे.कोरोना संचारबंदीपूर्वी सन २०१९ मध्ये त्यांनी संत गजानन महाराज मंदिर पोलिस स्टेशनचे प्रगटदिनाचे पालखी सोहळ्यामध्ये कारंजा येथे त्यांनी वयाच्या ८५ वर्षी,हुबेहूब ब्रम्हांडनायक संत गजानन महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या अप्रतिम भूमिकेने साक्षात शेगावीचा राणा कारंजा नगरीत अवतरल्याचा भास त्यादिवशी श्रींच्या भक्तमंडळींना होत होता.अशा हरहुन्नरी अष्टपैलू नेतृत्वाने,गुरुवार दि. ९ मार्च रोजी ब्रम्हलिन होण्याचे भाग्य मिळविले.त्यांच्या परिवारात तिन मुले,स्नुषा,नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे .१० मार्च रोजी सकाळी ११ : ३० वाजता,बायपासस्थित स्मशानभूमित त्यांचेवर अंत्यसंस्कार पार पडला. यावेळी त्यांच्या असंख्य आप्तस्वकिय, मित्रमंडळी व चाहत्यांची उपस्थिती होती. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांनी आपल्या परिवारतर्फे तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद, विदर्भ लोककलावंत संघटना, साप्ता . करंजमहात्म्य परिवाराचे वतीने आणि श्री कामाक्षा माता संस्थान, श्री संत गजानन महाराज मंदिर तर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. असे वृत्त ठाकरे परिवाराचे निकटवर्ती उमेश अनासाने यांनी दिले आहे.