चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील मोरवा नियतक्षेत्रअंतर्गत वांढरी, साखरवाही, येरूर, नागाळा, सिदूर, वेंडली, मोरवा गाव परिसरात व शेतशिवारात धुमाकुळ घालून पाळीव प्राणी व मानवी जिवीतास धोकादायक ठरलेला वाघीणीला वनविभागाने मंगळवारी जेरबंद केले.मागील 2 महिन्यापासून या वाघीणीचा वांढरी, साखरवाही, येरूर, नागाळा, सिंदूर, वेंडली, मोरवा गाव परिसर व शेतशिवारात वावर होता.ती या परिसरातील पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत होती. त्यामुळे ग्रामस्थांचा वनविभागाविरूध्द प्रचंड रोष निर्माण झाला होता. वाघीणीला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली होती. या वाघीणीचा मागोवा घेण्याकरिता वनविभागातर्फे त्या क्षेत्रात पिंजरे, कॅमेरे ट्रप व स्थानिक पीआरटी सदस्य नैतान केले होते. ही वाघीण पिंजर्याजवळ येत होती. परंतु पिंजर्यात शिरत नव्हती. वनविभागाच्या चमूने या वाघीणीचा शोध सुरु केला. दरम्यान, 7 ऑगस्ट रोजी दुपारी ही वाघीण वांढरी येथील बापूराव आसुटकर यांच्या शेत सर्व्हे क्रमांक 63 मध्ये बकरी मारून खात असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून लगेच कर्मचार्यांनी बापूराव आसुटकर यांच्या शेताकडे धाव घेऊन या वाघीणीवर पाळत ठेवली आआरटी व आरआरयू पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी व शुटर यांनी त्यांचे वाहन वाघीणीच्या दिशेने वळविले. तेव्हा ती वाघीण पाळण्याच्या प्रयत्नात असताना वनविभागाच्या आरआयू पथक व क्षेत्रीय कर्मचार्यांनी या वाघीणीचा पळण्याचा मार्ग रोखून धरून तिला शुटरच्या वाहनाकडे वळविण्यात आले. वाघीण झुडपात लपून बसली असता वनविभागाच्या शूटरने तिला ट्रॅगुलाईज गनद्वारे बेशुध्द करून जेरबंद केले.tigress या वाघीणीला पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डार्ट तयार केला व शुटरचे कार्य पोलिस नाईक राहुल मराठे यांनी पार पाडले. या वाघीणीला चंद्रपूर येथील ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटर येथे आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली व सुरक्षीत ठेवण्यात आले.ही मोहिम चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक निकिता चौरे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली. या मोहिमेकरिता डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर मराठे, चंद्रपूरचे क्षेत्र सहायक एच. पी. डोंगरे, दुर्गापूरचे क्षेत्र सहायक ए. पी. तिजारे, वनपा डब्ल्यू. एल. कोडापे, डी. एम. दुपारे, वनरक्षक एस. एम. मट्टामी, पी. ए. कोडापे, डी. बी. दहेगांवकर, व्ही. पी. भिमनवार, एस.पी. पारवे, बी. एम. वनकर, आर. जी. बैनलवार, वाहनचालक अमोल कोरपे, अक्षय दांडेकर वाहनचालक, के. एम. चहांदे, वनमजूर के. जी. डांगे, मोरवा नियतक्षेत्रातील रोजंदारी मजूर व स्थानीक पीआरटी सदस्यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....