मेंढी जागीच ठार तर चार बकरे जखमी सिंदेवाही वरून जवळच असलेल्या आंबोली येथील शेतशिवाराचा हद्दीत ही घटना घडली आहे. अचानक काल रात्रौ झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर पावसादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. वीज पडून एक मेंढी जागीच ठार झाली तर चार बकरे जखमी झाले आहेत. अशी माहिती मिळताच सिंदेवाही तहसील चे तलाठी पंचभाई व मंडळ अधिकारी चीडे हे आंबोली येथील शेत शिवारातील घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून सिंदेवाही तहसील कार्यालयात माहिती दिली आहे.
वीज पडून मृत्यू झालेली मेंढी व किळकोर रित्या जखमी झालेले चार बकरे हे मारोती येंगेवार यांच्या मालकीची होती. यामध्ये त्यांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी याकरता त्यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे.