क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढल्या. त्यांनी सर्व जातीधर्माच्या मुला-मुलींना मोफत शिक्षण दिले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्त्री असल्याचा त्यांनी कधीही न्युनगंड बाळगला नाही. महीलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी फार मोठे कार्य केले. महीलांच्या खऱ्याखुऱ्या उध्दारकर्त्या त्या आहेत असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी बौध्द समाज, रमाई महिला मंडळ व तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बुध्दभीम गितांच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी दलितमित्र डी.के. मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नामदेव किरसान, माजी नगरसेवक जगदीश आमले, माजी जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, राहुल शिवणकर हे होते. तर अध्यक्षस्थानी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके हे होते.
उपाध्यक्ष म्हणून माजी जि.प. सदस्य डॉ राजेश कांबळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच राजेश पारधी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, अनुसूचित जाती सेलचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, नाट्यकलावंत हिरालाल सहारे, सरपंच मंजुषा ठाकरे, उपसरपंच विनोद घोरमोडे, ग्रामसेवक किशोर अलोने, ग्रामपंचायतीचे सदस्य यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.