वाशिम : हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व पुनर्वसन अधिनियम 2013 अंतर्गत दुषित गटारामध्ये कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षित साधनांशिवाय उतरणे हा गुन्हा मानण्यात येतो. याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने 27 मार्च 2014 रोजी दिलेल्या निर्णयानुसार सन 1993 पासुन सफाई कामगार/मॅन्युअल स्कॅव्हेजर्सचे काम करतांना दुषित गटारांमध्ये मल:निस्सारण कुंड, खड्डे व भुमिगत गटारे वाहिन्यामध्ये मृत्यु पावलेल्या सफाई कामागारांच्या कुटूंबाचा शोध घेऊन अशा मृत्यु पावलेल्या कामगारांवर अवलंबून असणाऱ्या कुटूंबातील सदस्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,असे निर्देश आहे.
त्याअनुषंगाने या बाबतीत सफाई कामगार/ मॅन्युअल स्कॅव्हेजर्सचे काम करतांना अशा दुषित गटारामध्ये मृत्यु पावल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटूंबातील सदस्यांनी मयत झालेली व्यक्ती ज्या प्राधिकारी यंत्रणेच्या अंतर्गत काम करतांना मय्यत पावलेला आहे,त्या प्राधिकारी यंत्रणेच्या दाखल्यासह अर्ज सात दिवसाच्या आत सहायक आयुक्त, समाज कलयाण, वाशिम येथे दाखल करावा. असे अवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.