कारंजा (लाड) सर्वधर्मियांचे प्रतिक आणि गोपाळ,गवळी, गोंधळी, राजस्थानी, मारवाडी, गुजराती बांधवाचा संपूर्ण देशभरात साजरा होणार्या गोकुळष्टमीच्या सणाचे महत्व खूपच विशेष असे असते. खऱ्या अर्थाने पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवातच गोकुळाष्टमी पासून होत असल्यामुळे आबालवृद्धा पासून स्त्री पुरुषांमध्ये गोकुळाष्टमीचा महोत्सव मोठ्या हर्षोल्हासात केल्या केल्या जातो. ह्या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे रासक्रिडा, गरबा आणि दहीहंडी गोपाळकाल्याचा उत्सव ! या दहिहंडी उत्सवाला राज्याच्या क्रिडा विभागाने क्रिडा प्रकारात मंजूरी द्यावी. अशी अनेक क्रिडा मंडळे, व्यायाम शाळा व गोविंदा पथकांकडून मागणी होत होती अखेर या मागणीला नवनिर्वाचित, मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिल्यामुळे कारंजा शहरातील क्रिडा मंडळे, व्यायाम शाळा आणि गोविंदापथकाकडून त्याचे स्वागत करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील या दहीहंडी धार्मिक उत्सवाला खेळाचा दर्जा मिळणे ही खूप मोठी फलश्रूती असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी म्हटले असून त्याकरीता त्यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांचे आभार व्यक्त केले आहे .