कारंजा (लाड) -- वाशिम जिल्ह्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने,नवीन नियुक्त्या केल्या जात असुन,शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, सुशिक्षीत व सुसंस्कृत घराण्यातील व्यक्तिमत्त्व तसेच शांत, मनमिळाऊ व मीतभाषी असलेले ॲड संदेश जिंतुरकर यांची "कारंजा शहर संघटक" म्हणून नियुक्ती झाली आहे.
शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशानुसार व अपराजित माजी खासदार व आ. भावनाताई गवळी तसेच जिल्हा प्रमुख विजयभाऊ खानझोडे यांच्या नेतृत्वात ही नियुक्ती झाली असून नुकतेच रिसोड येथील कार्यालयात आ. भावनाताई गवळी यांनी ॲड.संदेश जिंतुरकर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
शहरात ॲड.संदेश जैन जिंतुरकर यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम असुन सर्व पक्षीय नेत्यांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांशी ॲड.संदेश यांचे सौहार्दपूर्ण व प्रेमाचे संबध आहे.म्हणूनच आगामी काळात येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदेश जिंतुरकर यांची हि नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
ॲड.संदेश जिंतुरकर यांनी पदाची कोणतीही अट वा अपेक्षा न ठेवता शिवसेनेत यापूर्वीच प्रवेश करुन पक्षाच्या व्यासपीठावरून वरिष्ठ नेते यांच्या आदेशानुसार केवळ कार्यकर्ता म्हणून ते आजतागायत कार्य करीत राहीले. अखेर आ. भावनाताई गवळी यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन ॲड. संदेश जिंतुरकर यांना ही पक्ष संघटनाची जवाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती मुळे शहरात शिवसेनेचा विस्तार होऊन पक्ष बळकट होईल असा विश्वास आ.भावनाताई गवळी यांनी नियुक्तीपत्र देतांना व्यक्त करुन भविष्यातील कार्यांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
शहर संघटक सारखे महत्त्वाचे पद दिल्याबद्दल संदेश जैन जिंतुरकर यांनी आ. भावनाताई गवळी, जिल्हा प्रमुख विजयभाऊ खानझोडे, कारंजा तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे तसेच अन्य नेत्यांचे आभार मानून,पक्षाच्या तत्वावर व ध्येय धोरणावर विश्वास ठेवत पक्ष वाढीसाठी सर्वांशी समन्वय साधून काम करु .अशी ग्वाही ॲड. संदेश जिंतुरकर यांनी दिली आहे.