ब्रम्हपुरी नागपूर बस सकाळी सव्वा साहा वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूर साठी निघाली असता ब्रह्मपुरी - नागभीड राष्ट्रीय मार्गावरील सायगाटा जंगल परिसरात बसचा स्टेरिंग अचानक लॉक झाल्याने बस क्रमांक:- एम.एच.१३सी.यु.७५१८ रस्त्याच्या बाजूला उतरली. वेळीच चालक जितेंद्र गायकवाड यानी समय सूचकता दाखवत, तत्परतेने प्रवाशांचा जीव वाचविला. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु वाहक नरेंद्र गाडगीलवार याच्या पायाला किरकोळ मार लागला आहे.
सदर घटना घडण्या अगोदर एक छोटा पुल होता पुलाचे खाली जर बसचे चाक गेले असते तर बस पलटण्याची मोठी श्यक्यता होती. पण चालकाने बसला त्यापासून वाचविले व मोठी दुर्घटना टळली.