कारंजा (लाड) : "कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघात, गेल्या दहा वर्षात जेवढी काही विकासकामे झालीत त्याचे सर्व श्रेय केवळ भाजपा पक्षाला आणि महायुती सरकारला जाते. लाडकी बहीण योजना, लखपती दिदी योजना, एसटीच्या प्रवासात माहिलांना 50 % सवलत देवून आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना सक्षम केले. आशा वर्कर,सरपंच,पोलीसपाटील यांच्या मानधनात दुपटीने वाढ केली.जिल्ह्यात समृद्धी महामार्ग,अनेक रेल्वेमार्गासह शंकुतला रेल्वेकरीता विकास निधी दिला.असे सांगतानाच शेतकऱ्याचे आम्ही नुकसान होऊ देणार नाही.सोयाबीनचा भाव जरी कमी असला तरी बाजारभावाच्या फरकाची रक्कम शेतकर्याच्या बँक खात्यात जमा करू, पि एम किसान योजनेची रक्कम बारा हजार ऐवजी पंधरा हजार करणार असल्याचे आणि लाडकी बहीन योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकविसशे रुपये करणार असल्याचे जाहीर केले.तसेच येणार्या दि 20 नोव्हेंबर रोजी होणार्या निवडणूकीत कारंजाच्या उमेद्वार सईताई डहाके,रिसोडच्या महायुतीच्या उमेद्वार भावनाताई गवळी आणि वाशिमचे उमेव्दार श्यामभाऊ खोडे यांनाच बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले." याबाबत अधिक वृत्त असे की, कारंजा मानोरा महायुतीच्या उमेद्वार सईताई डहाके यांच्या प्रचारार्थ,शनिवार दि.09 नोहेंबर 2024 रोजी दुपारी विद्याभारती कॉलेज समोरील मैदानामध्ये भाजपाचे शिर्षस्थ नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या जाहीर प्रचारसभेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचकावर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष राजु पाटील राजे,माजी खासदार तथा रिसोड मालेगावच्या उमेद्वार आ. भावनाताई गवळी,आ.लखनजी मलीक, माजी आमदार विजयराव जाधव, डॉ . रणजीत देशमुख, पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज, माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेछा, दुसरे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, तेजराव वानखडे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी सर्वप्रथम डॉ महेश चव्हाण, बाबुसिग नाईक आदींचा भाजपा प्रवेश घेण्यात आला. देवेन्द्रजी यांनी आपल्या संभाषणामधून बोलतांना सर्वप्रथम परिसरातील ग्रामदैवत श्री कामाक्षा माता, नृसिह सरस्वती स्वामी यांचे वंदन केले. तसेच शेवटी माजी आमदार प्रकाशदादा डहाके आणि राजेंद्रजी पाटणी यांच्या आठवणींना उजाळा देत,पाटणी यांच्या काळात मतदार संघातील विकासकामासाठी भरपूर विकास निधी दिला व यानंतर सईताई डहाके यांच्या मार्फत देखील विकासकामे केली जातील याची ग्वाही दिली. असे वृत्त जिल्ह्यातील आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.