कारंजा : पत्रकारांच्या न्याय हक्का करीता लढा देणारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ही एकमेव संघटना असून, विदर्भाचे प्रदेशाध्यक्ष वाशिम येथील दैनिक विदर्भ मतदार वाशिमचे निवासी संपादक बाळासाहेब देशमुख हे पत्रकारांच्या न्याय हक्क लढ्याकरीता जागृत राहून शासन दरबारी पत्रकाराच्या समस्या सोडविण्याकरीता सतर्कतेने कार्यरत आहेत . पत्रकारांना ऊन असो वा पाऊस, रात्र असो वा दिवस . कशाचीही पर्वा न करता प्रसंगी तळहातावर प्राण घेऊन जीवावर उदार होऊन समाजसेवा हे कर्तव्य समजून संकटाना सामोरे जात वृत्तसंकलन करावे लागते आणि त्यामुळेच त्यांनी अपघातात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या सदस्य असलेल्या पत्रकारांना काही इजा झाल्यास तात्काळ मदत मिळावी म्हणून तात्काळ पाच हजार रुपये विवाविलंब मदतीची घोषणा केली आहे . तरी विदर्भातील जास्तित जास्त पत्रकार बंधूनी बाळासाहेब देशमुखांचे पाठीशी उभे राहून, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्यत्व घेण्याची सर्व पत्रकारांना, जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केली आहे .