कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : महाराष्ट्र शासनाच्या "शासन आपल्या दारी ह्या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजवणीची कारंजा नगर पालिकेचे मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी जय्यत तयारी केल्याचे दिसून येत असून त्याकरीता नियोजन व अमंलबजावणीच्या दृष्टिने,कारंजा नगर पालिका कार्यालयात दि ६ जून रोजी नगर पालिकेच्या सर्व विभागाची बैठक मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आपल्या अधिकारी व कर्मचारी वृंदाना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत कारंजेकर नागरिक लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजनाचा लाभ कमित कमी कागदपत्रे घेऊन जलंद मंजूरी देऊन प्रत्यक्ष लाभ देण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. त्यामुळे संबधित सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागांतर्गत असणाऱ्या योजना, ज्यामध्ये पंतप्रधान आवास (घरकुल)योजना, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, स्वनिधी योजना, दिव्यांग कल्याण योजना आदी योजनांची माहिती प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत घरपोच पोहचविण्यात यावी. लाभार्थ्यांकडून प्रस्ताव घेऊन, जमा करून घ्यावे. व शिबीराचे आयोजन करून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा . अशा सूचना मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी नगर पालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी यांना दिला आहेत. तसेच कारंजेकर नागरिकांनी सुद्धा शासन आपल्या दारी योजने अंतर्गत लाभ मिळविण्याकरीता सहभाग घेण्याचे आवाहन सुद्दा मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी यावेळी केले आहे. असे वृत्त कारंजा नगर पालिकेकडून प्रसिद्धी करीता मिळाले असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी दिले आहे.