कारंजा - : काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष नेते,खा.राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून आपण हि प्रेरणा घेतली असुन ज्या प्रमाणे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर, बेरोजगार युवक, महिला वर्ग ,कामगार वर्ग यांचेशी संवाद साधून समस्या समजावून घेतल्या. अगदी त्याचप्रमाणे समस्या शोध दिंडीच्या माध्यमातून गावागावात जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या आपणही समजून घेणार आहोत अशी माहिती वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार यांनी दिली.
सर्वप्रथम कारंजा तालुक्यातील ग्राम गिर्डा या गावात दिंडीने प्रवेश केल्यानंतर दि. 29 व 30 ऑगस्ट रोजी वाकी, वाघोळा , वडगाव, पसरणी, सोहळ, गायवळ शेलूवाडा, किनखेड , कोळी तपोवन , वाई ,शेवती, मांडवा, मुरंबी, किसान नगर व लोहारा येथे जाऊन तेथील समस्या देवानंद पवार यांनी नागरिकांकडून समजवून घेतल्या. यावेळी बहुसंख्य नागरिकांनी देवानंद पवार यांच्या जवळ समस्यांचा पाढाच वाचला.
यावेळी वाशिम जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ॲड संदेश जैन जिंतुरकर , जिल्हा उपाध्यक्ष ॲड वैभव ढगे, जिल्हा सरचिटणीस ॲड निलेश कानकिरड,कारंजा लाड तालुका अध्यक्ष विजय देशमुख, शहर अध्यक्ष अमीर खान पठाण, रोमील भाई, युसूफ भाई जट्टावाले, वासुदेवराव तायडे, असलम भाई ठेकेदार, अरविंद राठोड, विलास जाधव, फैजल खांन पठाण, बाबाराव जाधव, आनंदराव राठोड, सचिन राठोड , पंकज राठोड, शोराब खांन पठाण व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....