कारंजा : आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक,आध्यात्मिक,सांस्कृतिक,सामाजिक,पर्यावरण, रुग्नसेवा इत्यादी क्षेत्राकरीता खर्ची घालून, बचतगटाच्या माध्यमातून कितीतरी महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या,समृद्धी गृह उद्योग कारंजाच्या संस्थापिका स्व. छायाताई गजाननराव गावंडे यांचे नुकतेच दि.१३ जून २०२५ रोजी त्यांच्या वडिलबंधू स्व.सुनिल नारायणराव काळे यांच्या मृत्युचे अतिव दुःख सहन न झाल्याने,भावाचे पाठोपाठ ह्या बहिनीचे सौ.छायाताई यांचेही निधन झाले झाले होते.त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत होती.आणि ठिकठिकाणाहून शोक संवेदनाही व्यक्त केल्या जात आहेत.स्व. छायाताई यांच्या आकस्मिक जाण्याने गावंडे परिवाराची केव्हाही भरून न निघणारी हानी झाली असून त्यांचे घर एकमेव गृहिणी पासून वंचित झाले आहे. त्यांचे पती गजाननराव गावंडे हे अर्धांगीनीच्या जाण्याने एकाकी पडले असून,अविवाहीत मुलाचाही मायेचा पाझर निघून गेला आहे. त्यांना पती, एक अविवाहित मुलगा प्रतिक,दोन विवाहित मुली सौ.कोमल आणि सौ. समृद्धी आहेत.ही वार्ता वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या कानावर पडताच त्यांनी गावंडे परिवाराचे सांत्वनाकरीता त्यांचे घर गाठले.आणि गावंडे व काळे दोन्ही परिवाराचे सांत्वन करीत त्यांना धिर दिला.असे वृत्त खा. संजयभाऊ देशमुख मित्र मंडळ कारंजाचे प्रदिप वानखडे यांनी कळवीले आहे.