दोन वर्षात चंद्रपूर शहरातील रामनगर परिसरात 12 घरफोड्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात रामनगर पोलिसांना मोठं यश मिळाले आहे.रामनगर परिसरात 12 घरफोड्या करणात आल्या होत्या.या घरफोड्या करण्यात सहा आरोपींचा समावेश होता. या आरोपींमध्ये दोन सोनारांचा पण सहभाग असून त्या आरोपींकडून 41 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये सोने ,चांदीसह गाड्यांचाही समावेश आहे. विश्वजीत सिकंदर (30) दिवाकर गोलकोंडावार (28) , शुभम येनपल्लीवार (29), विकार विश्वास (25) अमित विश्वास (29) अशी आरोपींची नाव असून हे सर्व आरोपी चंद्रपूर शहरातीलचं आहे. घरफोड्यांचा शोध लावण्यात रामनगर पोलिसांना यश मिळाल्याने परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.