वरोरा : ग्रामपंचायत निवडणुकीत ४ वेळा अपयश आले मात्र वारंवार येणाऱ्या अपयशाला न डगमगता पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरून घवघवीत यश प्राप्त संपादन करून थेट सालोरी गट ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर शिवसेना (उबाठा ) चे गजानन देहारी विराजमान झाले आहे.त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी अभिनंदन केले आहे.
तालुक्यातील सालोरी गटग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच संपन्न झाली.या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे ३ उमेदवार विजयी झाले आहे. यातीलच गजानन देहारी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत यावर्षी मोठ्या मताधिक्याने यश संपादन केले आणि उपसरपंच पदासाठी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी वरोरा -भद्रावती विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले व आदी शिवसैनिक उपस्तिथ होते.
प्रतिक्रिया
जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे
आमचे जेष्ठ शिवसैनिक गजानन देहारी यांना ४ वेळा अपयश येऊन सुद्धा त्यांनी अपयशाला न खचता जिद्दीने समोर जाऊन यश संपादन केले आहे. हि खूप कौतुकास्पद बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आजच्या तरुण पीडीने सुद्धा कुठल्याही क्षेत्रात आलेल्या अपयशाला न खचता आपले प्रयत्न सुरु ठेवावे एक दिवस यश नक्की तुमच्या पदरी पडेल याचेच हे एक उदाहरण गजाननजी देहरी यांच्या माध्यमातून समोर आले आहे.