कारंजा - दिनांक १फेब्रुवारी २०२४ रोजी विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय श्री राजेंद्र पाटणी साहेब यांच्या प्रयत्नाने कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात मंजूर झालेल्या कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. शहा, अनई, इंझा (वनश्री ), खेर्डा,कार्ली, लोणी अरब, धनज येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञायकभाऊ पाटणी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. कामाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ.राजीव काळे होते. कार्यक्रमात ज्ञायकभाऊ पाटणी व भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे यांनी मार्गदर्शन केले. अर्थ संकल्प,२५१५, दलीत वस्ती, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत १४.५ कोटी अंदाजित किंमत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी जी प सदस्या सौ. सुनिताताई नाखले, पं. स. सदस्य शुभम बोनके, प्रदेश सदस्य विजय काळे, उपाध्यक्ष राजीव भेंडे, सुरेश गिरमकार,सा. बांधकाम विभागाचे चव्हान, माकोडे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कांबळे आदीसह अन्य उपस्थित होते.शहा येथे - रा. मा. २८२ ते शहा पोच मार्गाची रूंदीकरणासह सुधारणा करणे.ग्रा. मा.५१ की.मी. ०/०० ते २/०० ता. कारंजा अंदाजित किंमत १३० लक्ष , वाशिम जिल्ह्यातील ग्रा. मा. २८२ ते शहा पोच मार्गावर की. मी. ०/६०० मध्ये स्कॅन ड्रेनचे बाघ. करणे. ग्रा. मा.५१ ता. कारंजा अंदाजित किंमत ३० लक्ष,वाशिम जिल्ह्यातील कामरगाव उंद्री, बांबर्डा, शहा ते कारंजा रस्त्याचे बाधकाम करणे. प्र. जि.मा.३५ की.मी.९/०० ते १२/०० ता. कारंजा अंदाजित किंमत ४०७ लक्ष , या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.शहा येथील कार्यक्रमात विजय पाटील काळे, सुरेश गिरमकार, अक्षय लकडे, उप सरपंच संदीप पाटील, चेतन मोटे, वंदना श्रिरासागर तुलासिरम तायडे, दिनेश घोडेस्वार, प्रमोद काशीकर, गजानन कऱ्हे, धिरज अवघन, जगदेव पाटिल, सारंग पाटिल, सुरेश पाटील इत्यादी सह गावातील नागरिक उपस्थित होते . अनई येथे गोरखनाथ मंदीर सभामंडप बांधकाम करणे २५/१५ अंतर्गत अंदाजित किंमत १० लक्ष,अनई येथे कब्रस्थांनकडे जाणारा रस्ता करणे (अल्पसंख्याक) अंदाजित किंमत १५ लक्ष,जांब ते अनई रस्ता, 4 रप्ते रपटे बांधकाम करणे मुख्यमंत्री ग्राम सड़क योजने अंतर्गत अंदाजित किंमत ९४.९७ लक्ष,-इंझा येथे हनुमान मंदीर परिसरात सौदींकरण करणे २५१५ अंतर्गत अंदाजित किंमत १० लक्ष,इंझा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये सभामंडप बांधकाम करणे दलीत वस्ती अंतर्गत अंदाजित किंमत १० लक्ष,-इंझा येथे दलीत समाजाकरीता सभामंडप बांधकाम करणे (दलीत वस्ती)अंदाजित किंमत १० लक्ष, इंझा येथे येवता शिवाडी ते उंबर्डा ग्रामीण रस्ता करणे २५१५ अंतर्गत अंदाजित किंमत ०.२.०० लक्ष, या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.कार्यक्रमात सर्वश्री भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे, जि.प सदस्या सौ. सुनीताताई दिलिपराव नाखले , भाजपा उपाध्यक्ष संकेत नाखले, पंचायत समिती सदस्य शुभम बोनके , समिती सदस्य दिनेश वाडेकर, येथील सरपंचसौ .राधिका संकेत नाखले , कमलाकर मोरे ,यावर्डी सरपंच परमेश्वर आमले ,आखतवाडा येथील सरपंच विजय मुगल ,वडगाव रंगे येथील सरपंच अखिलेश रंगे , इंझा येथील येथील उप सरपंचा, बन्सीभाऊ चौधरी ,संतोष भगत ,तंटामुक्ती अर्जुन सोळंके ,भगत, मनभा येथील सरपंच शितल बापू देशमुख इत्यादी उपस्थित होते.खेर्डा येथे इजिमा २५ ते खेर्डा कारंजा वहीतखेड रस्ता, १३ रप्टे बांधकाम करणे अंदाजित किंमत ३८५.०९ लक्ष या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.खेर्डा येथील कार्यक्रमात संजयभाऊ जिरापुरे ,सरपंच सौ.अर्चनाताई बिजवे, प्रमोदभाऊ जिरपुरे, अमोल बीजवे, मनीष गुल्हाने, रवी जिरापूरे, दिलिप जिरापुरे नामदेव बिजवे इत्यादी सह गावातील नागरिक उपस्थित होते. कार्ली येथे व लोणी अरब येथे लोणी अरब ते कालीं रस्त्याची रूंदीकरणासह सुधारणा करणे ग्रा. मा. ४० की. मी ०/०० ते ४/५०० ला. कारंजा अंदाजित किंमत २३४ लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.कार्ली येथे शुभाष पाटिल करडे,संजय पाटील करडे, धम्मदीप वासे ,मनोज वासे, कृष्णा करडे, कृष्णा कोल्हे, आदिनाथ ठाकरे,विद्याभूषण वासे, गोवर्धन वाघमारे, किशोर वासे, ज्ञानेश्र्वर करडे,शाम करडे, संतोष होडराव ईत्यादि सह गावातील नागरिक उपस्थित होते. तर लोणी अरब येथे लोणी अरब -अमोल ढगे, शराफत अली,पंचायत समिती सदस्य किशोर ढाकुलकर, विजय उंबरकर, गंगाधर ढाकुलकर, नानाभाऊ भिवगडे , सुनील आंधळे इत्यादी सह गावातील नागरिक उपस्थित होते.धनज येथे धनज ते मेहा रस्तयाची सुधारणा करणे इजिमा ३५ की. मी.०/०० ते २/०० ता. कारंजा अंदाजित किंमत १०४ लक्ष या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.धनज बु. येथे संतोष गुल्हाने दिपक दफडे, नुरखा पठाण, शितल कडु, रामा खंडारे, उद्धवराव बोबडे, अरूण बापुराव कडु, योगेश कडु ईत्यादि उपस्थित होते.सर्व कार्यक्रम स्थळी नामफलकांचे अनावरण करण्यात आले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांनी स्वागत केले. ईंझा अनई येथील कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. भाजपा उपाध्यक्ष संकेत नाखले यांच्या नियोजनाचे उपस्थितात कौतुक होत होते. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....