राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम मार्फत चार मैत्री क्लिनिक स्थापित करण्यात आले आहेत. यामध्ये १० ते १९ वयोगटातील मुलामुलींना लैंगिक आरोग्याबद्दल समुपदेशन व मार्गदर्शन केले जाते. जिल्हा रुग्णालय वाशिम, उपजिल्हा रुग्णालय कारंजा ,ग्रामीण रुग्णालय रिसोड ,ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर
या चार ठिकाणी मैत्री क्लिनिक आहेत. या क्लिनिकचा उद्देश किशोरवयीन मुलामुलींच्या प्रजनन व लैंगिक आरोग्यामध्ये सुधारणा करणे, किशोरवयीन मुलामुलींना त्यांच्या आरोग्याविषयीच्या समस्याबाबत
माहिती देणे.बालमृत्यू, मातामृत्यू एकूण प्रजनन दर कमी करणे. किशोरवयात मादक पदार्थाच्या अनिष्ट परिणामांबाबत जनजागृती वाढविणे, कुपोषणाचे प्रमाण व रक्तक्षय कमी करणे, किशोरवयात गर्भधारणा कमी करणे. किशोरवयीन मानसिक आरोग्याची समस्या संबोधित करणे,
मासिक पाळीमधील स्वच्छता संवर्धन योजनेंतर्गत रु. ६ प्रती सॅनिटरी नॅपकीन या दठात आशामार्फत किशोरवयीन मुलींना गावपातळीवर पुरवठा करणे. WIFS योजनेंतर्गत लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करणे, जंतनाशक गोळ्यांचे वितरण करणे हा उद्देश असल्याची
माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी दिली. मैत्री क्लिनिक अंतर्गत किशोरवयीन मुलामुलींना लैगिक आरोग्याबद्दल समुपदेशन व माहिती दिली जाते. विवाहपूर्व मार्गदर्शन केले जाते.कुटुंब नियोजना बद्दल मार्गदर्शन केले जाते. वैद्यकीय तपासणी व उपचार केले जाते. आणि माहितीची गोपनीयता ठेवली जाते. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त किशोरवयीन मुलामुलींनी मैत्री क्लिनिकला अवश्य भेट द्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले आहे.