ब्रम्हपूरी तालुक्यातील अड्याळ (जाणी) येथील युवा श्री शेतकरी माळी समाज दुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आले होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नामदेव लांजेवार हे उपस्थित होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून विनोद वासनीक, ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष घनश्याम भोयर, अविनाश तुपकर, रंजीत कसारे तथा ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना खेमराज तिडके म्हणाले की कला ही मानवाला भूषण आहे भूषण आहे कोणत्याही देशाच्या विकासात कलम महत्त्वाची भूमिका बजावते कला ही सामायिक दृष्टी दृष्टी मूल्य पद्धती आणि निश्चित ध्येय दर्शवते आपल्या देशात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना जागरूक केले जाते. या निमित्ताने सर्व लोक हेवेदावे सोडून एकत्र जमतात.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा श्री शेतकरी माळी समाज दुर्गा उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.