महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत नागपूर विभागामार्फत घेण्यात आलेल्या यावर्षीच्या बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक वर्गावर झूम कॅमेऱ्याद्वारे प्रशासनाने कॉपी करण्यावर नियंत्रण आणले होते. अशा वातावरणात जे अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा रामगड येथील कला शाखेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. यामध्ये समय नाजूकराव सलामे याने 73.33% गुण घेऊन कुरखेडा तालुक्यात कला शाखेत सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. त्याचे शाळेच्या वतीने त्याच्या घरी जाऊन मुख्याध्यापका सह सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून अभिनंदन केले. यामध्ये शाळेचे मा. प्राचार्य श्री. किशोर तुमसरे सर, प्रा. श्री.वसंता पत्रे सर, प्रा.श्री. संदीप दोनाडकर सर, प्रा. श्री. धनंजय वाणी सर प्रा. श्री. काशिनाथ कुंडगीर सर,श्री. प्रदीप बेलपाडे शहर प्रा.श्री.प्रभू टेकाम सर, प्रा. कु. सोनेवाणे मॅडम प्रा. कु. बुलबुल वाळके मॅडम, कु.वंदना केंद्रे मॅडम, श्री. विनायक चिडे सर, श्री. दिवाकर रामटेके सर यांनी तसेच शाळेचे अधीक्षक हेमंतकुमार धरमे सर आणि अधीक्षिका मनीषा ठलाल मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद इतर कर्मचारी यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.