वरोरा:- वरोरा शहरातील उडान पुलावरून चंद्रपूर या गवी जात असताना अज्ञात चोरटयांनी वणी टोल नाका जवळप्रवीण मडावी रा
तुकुम, चंद्रपूर यास मारहाण करून मोबाईल, व पैसे हिसकले, यास विरोध केला असता चोरट्यांनी मारहाण करीत जखमी केले . ही घटना काल दि.22फे रू ला साडेपाच वाजता घडली. विनोद सातपुते रा. कालरी वॉर्ड ,वरोरा याचे 21 फेब्रुवारीला शेतकरी भवण, वरोरा येथे लग्न होते. 22 फेब्रुवारी सत्य नारायण ची कथा कॉलरी वार्ड येथे राहत्या घरी असल्याने मडावी येथे गेले होते, कार्यक्रम आटोपून गावाकडे चंद्रपूर ला जात असताना टोल नाका जवळ. पैसे आणि मोबाईल हिसकावून मारहाण केली.या प्रकरणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. शहरात अनेक ठिकाणी नेहमीच अश्या प्रकारच्या लहान मोठ्या चोऱ्या लुटमार होत असून यावर वरिष्ठ अधिकारी अंकुश लावण्यास असमर्थ ठरित आहे. खास करून डी.बी पथकातील काही कर्मचारी यांच्यामुळे गावाची ही परिस्थिती झाली आहे.