अवैध मटका व जुगार व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून मटका बुकी मालकांच्या मुसक्या आवळणाऱ्या जिल्हा पोलिस प्रशासनाला ब्रम्हपुरीतील मटका जुगार, बंद करण्यात अपयश येत असल्याने सर्वत्र खमंग चर्चा असून आश्चर्य व्यक्त होतं आहे.
ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदा मटका, जुगार व्यावसायिकांचे प्रमाण फोफावत असल्याने अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न तालुक्यात निर्माण होत आहे. विशेषतः मटका माफिया ब्रह्मपुरीत एक नसून चार ते पाच लोक स्वतंत्रपणे मटका, जुगार चालवत आहेत. त्यापैकी अलंकार टॉकीज परिसर, वाडेकर हॉस्पिटल शेजारी, ग्रामपंचायत खेड तर गुजरी चौकामध्ये असल्याचे लोकचर्चेतून समजत आहे. या सट्टा, मटका माफीयांकडे ब्रह्मपुरी तालुक्यातील गावखेड्यात तसेच ब्रह्मपुरी शहरामध्ये विविध पान टपऱ्यांवर यांचे एजंट द्वारे मटका संकलन केल्या जातो व कमी वेळात झटपट श्रीमंत होण्याच्या नादात रुपयावर अंशी रुपये मिळत असल्याने बेरोजगार तसेच लालची प्रवृत्तीचे लोक या मटक्याच्या मागे लागलेले असून आज पर्यंत हे मटका किंग लाखो करोडो ने श्रीमंत होत आहेत मात्र मटक्यावर पैसा लावणारे गरीब व बेरोजगार आणखीनच गरिबीच्या दरीत ओढल्या जात आहेत.
सर्व मटका माफिया व्यवसाय सुरळीत चालावे व त्यांचा वचक असायला पाहिजे म्हणून स्थानिक यंत्रणेला "अर्थपूर्ण" पद्धतीने सोबत घेऊन चालत असल्यानेच ब्रह्मपुरी तालुक्यात व शहरात हा मटका व्यवसाय तेजीने व बेधडक होतं असल्याचे लोकांमध्ये खुलेआम चर्चिले जात आहे.तर जिल्हा प्रशासनाकडून यावर अंकुश लावण्यात येऊन मोहात गुंतलेल्या सामान्य नागरिकांना सट्टा,मटका, जुगार यातून दिलासा मिळावा अशी सुज्ञ नागरिक अपेक्षा बाळगून आहेत
सेटलमेंट गुरूंशी संपर्क साधतं चालतोय खेळ.
सट्टा,मटका,जुगार व्यावसायिकांना स्थानिक पोलिस, गुन्हा अन्वेषण विभाग किंवा इतर विशेष पथकाचा छापा पडणार नाही याची खात्री असल्याने कार्यक्षेत्रातील गावात संगनमताने अवैध व्यवसायांचा जम बसवण्यात आला आहे. दरमहा लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायाने अर्हेर-नवरगाव, खेड पिंपळगांव, रुई, निलज,पाचगाव अशा एक ना अनेक गावातील व्यावसायिकांनी "सेटलमेंट गुरुंशी" संपर्क वाढवीला असल्याचे दिसून येत आहे.