वाशिम - महान गायक स्व. महंम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त येत्या २८ डिसेंबर रोजी वाशिम येथे होवू घातलेल्या राज्यस्तरीय यादे रफी गीत स्पर्धेची गायनपूर्व चाचणी रविवार, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन येथे होणार असून या चाचणी स्पर्धेतुन कलावंतांचा स्पर्धेत प्रवेश निश्चित करण्यात येईल. तरी गायक कलावंतांनी या गायनपुर्व चाचणीत सहभाग घेण्याचे आवाहन नवनिर्माण फाऊंडेशन वाशिमच्या वतीने करण्यात आले आहे.
सामाजीक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवनिर्माण फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी महान गायक स्व. महंम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त २४ डिसेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय गितगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेेत विजयी स्पर्धकांना हजारो रुपयांची बक्षीसे व स्मृतीचिन्ह देवून प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जातो. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यभरातून शेकडो स्पर्धक वाशिमला येतात. यावर्षी होणार्या या स्पर्धेसाठी पुरुषगट, महिला गट व बाल गटासाठी हजारो रुपयांची लयलुट करण्यात आली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी तीन गाण्यांची तयारी करुन यावे. या चाचणीत पुरुष स्पर्धकांना केवळ स्व. महंमद रफी यांनी गायलेले गाणे म्हणणे बंधनकारक आहे. तर महिला व बाल स्पर्धकांना कोणतेही गाणे म्हणण्यास मुभा राहील. पुरुष व महिला गटासाठी राज्यातील गायक पात्र असतील तर बालगटासाठी स्थानिक बाल गायकच पात्र असतील. बाहेरगावच्या बाल स्पर्धकांना बालगटात संधी मिळणार नाही. गायनपुर्व चाचणी व स्पर्धा वाद्यवृंदासह घेण्यात येईल. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी शाम बढेल, महादेव हरकळ, जितु बढेल, एन.जी. मसरे, उमेश मोहळे, लक्ष्मण बढेल, मनोहर मानतकर, महेंद्र गंडागुळे, रोहीत बढेल व पवन शर्मा यांच्याशी संपर्क साधावा. राज्यभरातील महंमद रफी यांच्या चाहत्यांनी या गायनपुर्व चाचणी व स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन नवनिर्माण फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.