अकोला: स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता असलेल्या विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानच्या सहकार्याने विद्या भारती विदर्भ द्वारे प्रांतस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या सिंथेटिक ट्रॅक वर संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उदघाटन प्रांत संघटन मंत्री शैलेशजी जोशी यांच्या हस्ते मैदानाचे विधिवत पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली. या विदर्भ प्रांत स्तरीय स्पर्धेत अकोल्यातील श्री संताजी इंग्लिश प्रायमरी व माध्यमिक शाळा, अकोला येथील द्वितीय क्रमांक यश संदीप मोकळकर व तृतीय क्रमांक श्री गोपाल मुऱ्हेकर यांनी प्राप्त केला. प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त खेळाडूंची पश्चिम क्षेत्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष, विद्या भारती अकोला महानगर अध्यक्ष मंगेश वानखडे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.