ललित कला अकॅडमी व बाबूजी देशमुख वाचनालय आयोजित 'रंग भरो' स्पर्धेस उत्स्फूर्त
अकोला - अकोला नगरीचे शिल्पकार स्व. डॅडी देशमुख कला प्रिय नेतृत्व होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी विद्यापीठाचा राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले व ललित कला अकॅडमी ची स्थापना केली असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी केले.
ललित कला अकॅडमी , बाबूजी देशमुख वाचनालय व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या २० व्या पुण्यतिथी निमित्तआयोजित शालेय रंग भरो चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ललित कला अकॅडमी चे अध्यक्ष सुरेश राऊत, प्रशांत दादा देशमुख, प्रख्यात चित्रकार सतीश पिंपळे, प्रा. मोहन खडसे,बाबूजी देशमुख वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्रा, प्रा.शोभा भागडे,सौ.राजश्री देशमुख, मुख्याध्यापक विजय ठोकळ यांची विचारपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
स्व. डॅडी देशमुख यांच्या २०व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित शालेय रंग भरो चित्रकला स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय, श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा व बाबासाहेब ढोने चित्रकला महाविद्यालय या तीन परीक्षा केंद्रावर शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बबनराव कानकिरड यांनी केले.
या प्रसंगी माजी प्राचार्य विनायक जायले, प्रा व्हि.एम. पाटील, डॉ.किशोर पुरी ,प्रा. संजय पाटील, प्रा. बदणे, अधीक्षक राजेश गीते,प्रा. प्रवीण वाघमारे, डॉ. रावसाहेब काळे, प्रा. सावंत, सुनील देशमुख, प्रशांत उमाळे, मोडक, राजू देशमुख, काठोळे, श्रीकांत देशमुख, अमर देशमुख, प्रशांत पावडे, मेहेंगे, विजय वाकोडे यांचे सह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयात प्रा. दीपक वर्मा नाशिक यांचे हस्ते उद्घाटन झाले प्रा. बाळ नगरपर नाशिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते आयोजक प्राचार्य गजानन बोबडे ,सुनील कुमार नागपुरे, प्रा. सुवर्णा नागपुरे , विशाल वैष्णव, वैशाली आंबेकर ,जवाहर भड यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री शिवाजी विद्यालय शहर शाखेत मुख्याध्यापक मनोज देशमुख , हनुमंत सपकाळ , प्रेमेन्द्र जंजाळे, पंकज देशमुख, दिलीप देशमुख, मधुकर मानकर, अविनाश काळुसे, श्रीमती मराठे,प्रतिभा कराळे, सौ माहुरे ,निलेश देशमुख, आत्माराम गावंडे, महेंद्र कोकणे, विजय वाडसे यांची उपस्थिती होती.
बाबूजी देशमुख वाचनालयाचे
ग्रंथपाल सुरेश टेके, सहायक सतीश डगवाले, जुगल शिरसाट, नितीन कदम, स्वप्निल ताथोड ,निशा चौधरी ,प्रशांत हळवे, आनंद वाघमारे ,भाविक महाले, प्रणव मोपारी ,रोहन बोरसे ,हिमांश बायस्कर, तनिष्क खोपे ,ऋषिकेश भोलनकर, शौर्य वानखडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....