बार्टी चे समतादुत हे खरे समतेचे पाईक आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचविणारे शासनाचे खरे कार्यकर्ते मा.महासंचालक यांनी आपल्या मनोगतातून मांडले प्रेरणादायी विचार
वाशिम : नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रातील समतादूताची कार्यशाळ दि २५ मे ते ३० मे पर्यंत येरवडा संकुल पुणे येथे घेण्यात आलेली होती .सदर कार्यशाळेचे उद्धाटक व अध्यक्ष सुनील वारे महासंचालक बार्टी यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व प्रकल्प अधिकारी व समतादूतांना संबोधित करतांना अशा कार्यशाळेप्रमाणे कार्यशाळा यापूर्वी कधी झालेली नाही. ज्यामध्ये सर्वाचा इतका उत्साह दिसून येत आहे.समतादूत प्रकल्पातील सर्व मनुष्यबळ विशेषतः क्षेत्रीय प्रकल्प अधिकारी व समतादूत हे बार्टी चा अविभाज्य घटक असून शासनाच्या योजना तळागाळा पर्यत खऱ्या अर्थाने पोहचविण्यासाठी जर कोणते मनुष्यबळ आजच्या घडीला कार्यरत असेल तर ते समतादूत आहेत,की ज्यांनी आतापर्यंत अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले आहे.
त्यांनी बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना व उपक्रमांचा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात व्यापक प्रचार प्रसार केला व त्यानुसार योजनांची जी योग्य अंमलबजावणी झाली आहे त्याचप्रमाणे यापुढेही सदर कामकाज समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातूनच अविरत सुरू राहणार.प्रकल्पाच्या माध्यमातून कामकाज करत असतांना सदर मनुष्यबळास अनेक अडचणी येतात त्यातील एक अतिशय महत्त्वाची मागणी जी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे की,जी समतादूत व प्रकल्प अधिकारी लावून धरत आहेत ती म्हणजे त्यांचा पगारवाढ तर त्याअनुषंगाने ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी बार्टी मुख्यालय कटिबद्ध आहे असे विवेचन यावेळी मा.महासंचालक वारे सर यांनी केले.
समतादूत व प्रकल्प अधिकारी यांची वेतनवाढ शासकीय नियमानुसार होईल तसेच यापुढे देखील प्रकल्प अधिकारी व समतादूतांच्या पाठीशी बार्टी मुख्यालय खंबीरपणे उभे असेल असे आश्वासन यावेळी मा.महासंचालक यांनी दिले व भविष्यातील काम कामकाजासाठी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेचे उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला या उद्घाटनप्रसंगी श्रीमती स्नेहल भोसले विभाग प्रमुख,डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण विभाग प्रमुख, निबंधक इंदिरा आस्वार, विभाग प्रमुख रविंद्र कदम, श्री अनिल कारंडे विभाग प्रमुख, विभाग प्रमुख सतीश पाटील,कार्यालयीन अधीक्षक सचिन जगदाळे, समतादूत सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक श्रीमती इंदिरा आस्वार,निबंधक यांनी केले व समतादूतांना कामकाज संदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या. समतादूत प्रकल्प म्हणजे समाजाची ज्योत आहे व तेवत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे समतादूतांचे काम आहे. समतादूतांच्या समस्या सोडवण्या करिता मा.सचिव महोदय श्री.सुमंत भांगे व मा.सूनिलजी वारे सर सकारात्मक आहेत.असे संबोधित करित श्रीमती.इंदिरा आस्वार यांनी समतादूतांमध्ये प्रकाशाची ज्योत प्रज्वलित केली. त्यानंतर रविंद्र कदम विभाग प्रमुख, जात पडताळणी विभाग यांनी समतादूत हा तळागाळातील समाजाचा चेहरा आहे आणि समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणारा बार्टीचा एक महत्त्वाचा दुवा आहे. असे उद्बोधन करित समतादूतांमध्ये कार्याबद्दलची प्रशंसा केली.
विभाग प्रमुख, डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी समतादूतांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कटू प्रसंग सांगत समतादूत हा समतेचा वाहक आहे, समता-बंधूंता-सामाजिक न्यायाचा व भारतीय संविधानाचा चालता-बोलता समस्या निराकरण केंद्र आहे. समाजाच्या प्रत्येक समस्यांच्या समाधानासाठी एक आधारस्तंभ आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अनुयायी आहे व बाबासाहेबांनी सोसलेला संघर्ष समतादूतांच्या वाट्याला येणे एक भाग्यवंत अनुयायांच्या स्वप्न आहे व ते स्वप्न पूर्ण करणे समतादूतांचे कार्य आहे तसेच समतावादी महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रबोधन करिता समतादूतांना सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, डॉ.बाबासाहेब या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच तथागत गौतम बुद्ध, वस्ताद लहुजी साळवे व समतावादी थोर संतांचे जीवनावर विचारमंथन केले. MCED बाबत चालणारे ट्रेनिंग प्रोजेक्ट रिपोर्ट व समस्या अडचणी व निराकरण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
प्रोत्साहन पर व्याख्याने व विविध उपक्रमद्वारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरण करून समतादूत हे अत्यंत महत्त्वाचे पद असून त्यांना आपल्या जबाबदाऱ्या बाबत मार्गदर्शन केले. महामानवांबाबत चे महत्व देखील विशद केले. त्यांना आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून आपली जबाबदारी व सकारात्मकता व कामामध्ये प्रमाणिकपणा बाबत मार्गदर्शन केले.बार्टीच्या विविध विभागांची माहिती संबंधित विभाग प्रमुख यांनी देण्यात आले.
कार्यशाळेचा शेवट हा मा. महासंचालक वारे यांचे हस्ते उत्कृष्ट काम केलेले प्रकल्प अधिकारी व समतादूत यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच समतादूतांच्या समस्या -अडचणी जाणून घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करू असे देखील सांगण्यात आले. तदनंतर विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी माननीय महासंचालक व मान्यवरांचे तसेच आयोजक समतादूत प्रकल्पाची टीमचे व उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींचे आभार मानले.
मा. महासंचालक सुनील जी वारे, श्रीमती स्नेहल भोसले विभाग प्रमुख,श्रीमती इंदिरा आस्वार निबंध,विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण, श्रीमती वृषाली शिंदे विभाग प्रमुख, श्री रविंद्र कदम विभाग प्रमुख, श्री.अनिल कारंडे विभाग प्रमुख तसेच सचिन जगदाळे कार्यालयीन अधीक्षक ,श्रीमती नसरीन तांबोळी सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक तसेच श्रीमती तेजस्वी सोनवणे श्री.मनोज खंडारे श्रीम. विशाखा शहारे,श्रीम. उषा भिंगारे व श्रीमती पायल डोके व श्रीमती मंगल तसेच कार्यक्रमाचे प्रशिक्षणार्थी यांचे सूत्रसंचालन केलेले विजय बेदरकर,प्रकल्प अधिकारी,अकोला व श्री.चंद्रकांत इंगळे समतादूत, नाशिक यांनी केले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना मिळाले असल्याचे कळविण्यात आले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....