कारंजा : संत शिरोमणी श्री नरहरी महाराज हे आजच्या समाजाकरीता आदर्श असून त्यांच्या भक्तीने, परमात्म्याची शिव आणि विठ्ठल ही दोन्ही स्वरूपे एकच असून प्रत्यक्ष परमेश्वरामध्ये कोणताही भेदभाव नसल्याचे स्पष्ट झाल्याचे सुतोवाच करतांना, आपण मानवप्राणी मात्र माणसा माणसात भेदभाव करतो हे चुकीचे असून मानवप्राणी एकच असल्याचे सिद्ध होत असल्याचे डॉ संजय किटे यांनी प्रमुख अतिथी म्हणून मंचावरून बोलतांना स्पष्ट केले. या बाबत अधिक वृत्त असे की, कारंजा येथील सोनार समाज,संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या संयुक्त विद्यमाने आयोजक उमेश अनासाने यांनी आपल्या बालाजी ज्वेलर्स या प्रतिष्ठान मध्ये गांधी चौक येथे, संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथीचे आयोजन केले होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सोनार समाजाचे ज्येष्ठ नागरीक त्र्यंबकराव लोणकर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून सेवाभावी डॉ संजय किटे हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी नंदकिशोर कव्हळकर, श्रीकृष्ण अंगाईतकर, प्रल्हादराव गोगटे, प्रमोदराव ठोसर, बाळू मानेकर, दत्ता अंगाईतकर, दिलीप बोन्द्रे, संजय अंगाईतकर, गणेश अंगाईतकर, बाबू अंगाईतकर, गणेश कन्हे, प्रथमेश अंगाईतकर, संतोष इचे, कैलास हांडे, दिनेश दैवत आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, संचलन नंदकिशोर कव्हळकर तर आभार प्रदर्शन उमेश अनासाने यांनी केले. एकमेकांना सदिच्छा बऊन प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.