वाशिम : शेतकरी म्हणजे बळीराजा. "जगाचा पोशींदा" म्हणून त्यास गौरविले जाते.अशा शेतकर्याचे ऋण फेडण्या करीता "शेतकरी- दिन" साजरा केल्या जातो.त्यानिमित्ताने,बुधवार दि. 30 ऑगष्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता,अमरावती विभागीय शिक्षक संघाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात आमदार अँड किरणराव सरनाईक यांनी शेतकरी दिनाचे निमित्ताने उपस्थितांना शेतकरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याविषयी अधिक वृत्त असे की,शेतकरी दिनाचे औचित्य साधून आमदार अँड किरणराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख उपस्थितीत असलेले प्रा.डॉ. के.बी.देशमुख प्रमुख पाहुणे कारंजा येथील खेर्डा काळीचे सरपंच - प्रदिप वानखडे, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष -संजय कडोळे,कारंजा येथील संजय नेमाने इत्यादी होते. त्याच प्रमाणे कार्यालयीन वृंद उपस्थित होता.यावेळी उपस्थित शेतकर्यांना आमदार अँड किरणराव सरनाईक यांनी विश्वाचे पालणहार असणाऱ्या शेतकरी राजाचे थोर उपकार असून शेतकरी अनंत काबाडकष्ट सोसून,शेतामध्ये रात्रंदिवस घाम गाळून धान्य पिकवीत असल्याने आपणास अन्नधान्य मिळत असल्याचे सांगून त्यांचे ऋण फेडणे अशक्य असल्याचे सांगून शेतकरी राजामुळे आपण जगत असल्याची जाणीव क्षणोक्षणी ठेवायला हवी असल्याचे सांगत सर्वांना शेतकरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.