तालुक्यात बऱ्याच गावात जवळपास गल्लीबोडीत दारू मिळत असल्याने दारू पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत मात्र ज्यांच्याकडे केवळ मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा आहे. अशा व्यक्तींना सुद्धा दारूचे व्यसन जडले आहेत. अशा कुटुंबातील व्यक्तीसाठी दारू केवळ घातकच नसून तो त्यांच्यासाठी लागलेला एक कलंक ठरत आहे. त्या पासून सदरहू व्यसनाधीन नागरिकांनी दूर होऊन समाजात निर्लज्ज होऊन वागण्यापेक्षा कुटुंब आणि प्रपंचाचा विचार करून व्यसन सोडावे व समाजात प्रतिष्ठा कमवावी असे प्रतिपादन डॉक्टर गोकुळदास बालपांडे यांनी व्यक्त केले. ते किन्ही येथे दारू सोडा संसार जोडा अशा आयोजित एका कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर विशेष अतिथी म्हणून किन्ही येथील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश दर्वे तसेच सरपंच धीरज गोपाल धोंगडे यांची उपस्थिती होती.
सुरेश दर्वे यांनी प्रमुख अतिथीच्या स्थानावरून बोलताना समाजात घातक असलेल्या वस्तूंना टाळावे व कुटुंबात चांगले व्यक्तिमत्व कसे घडवता येतील याकडे लक्ष देऊन दारू पासून नागरिकांनी सदृढ आयुष्य कसे जगता येईल यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली