कारंजा (लाड) : वाशिम जिल्ह्याचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्या हवामान अंदाजाप्रमाणे लवकरच आकाशात अवकाळीचे ढग जमून दि. 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री व दि 27 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण वाशिम जिल्हासह पूर्व पश्चिम विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, हिंगोली, बुलडाणा, जळगाव खांदेश जिल्ह्यात,वारेवादळ,गारपिट व विजेच्या कडकडाटात अवकाळी पाऊस कोसळणार आहे.हा पाऊस जोरदार ते अति जोरदार असून,विजा पडण्याची व गारपिट होण्याची शक्यता आहे.तसेच अवकाळी पावसाचे हा अंदाज दि. 26 फेब्रुवारी 2024 ते 03 मार्च 2024 पर्यंत देण्यात आले आहेत.आपल्या हवामान अंदाजाबाबत ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचेशी भ्रमणध्वनीवरून बोलतांना हवामान अभ्यासक गोपालभाऊ गावंडे यांनी सांगितले की, "पर्यावरणातील बदलामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन आकाशात अवकाळी पाऊसाचे ढग जमणार असून,अवकाळी पाऊस पूर्वपश्चिम विदर्भासह, मराठवाडा आणि खान्देशच्या काही भागात आपले रौद्र रूप दाखविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली परभणी जळगाव इत्यादी भागात रिमझीम ते जोरदार पाऊस होण्याची काही भागात विजा पडण्याची तर काही भागात गारा पडण्याचीही शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे." अवकाळी पावसाचे ढग अचानक क्षणार्धात आकाश व्यापून टाकत असतात. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी,मजूर,गुराखी,मेंढपाळ यांनी आपआपल्या शेतमालाची, गुरेढोरे जनावरांची आणि स्वतःच्या जीवित्वाची काळजी घ्यावी. अवकाळीचे ढग आणि विजा कोसळत असतांना शेतात आणि हिरव्या झाडाखाली थांबू नये.असा इशारा त्यांनी दिलेला आहे. असे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाकाद्वारे कळवीले आहे .