थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि शिक्षण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दापत्याने पुणे बुधवारपेठ येथील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून महाराष्ट्र सह देशात शिक्षणाची फार मोठी क्रांती घडवली या क्रांतीमुळे आज महिलांना समाजामध्ये मान सन्मान आहे महिलांनी गावाच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत शिक्षणाच्या जोरावर ठसा उमटवला असून राज्यात अनेक महिला खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती अध्यक्ष सरपंच महापौर नगराध्यक्ष डॉक्टर वकील प्राध्यापक शिक्षक या सह अनेक ठिकाणी अग्रसेन पाहायला दिसतात.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यासर्व परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दापत्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावे अशी मागणी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण राज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी असते तर सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी असून या दोन्ही तारखेला मा फुले दापत्यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी ही मागणी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण राज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे