कारंजा (लाड) : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम अनई (ग्रामपंचायत : इंझा वनश्री) येथील,पश्चिम विदर्भातील एकमेवाद्वितीय असलेल्या, ऐतिहासिक-अतिप्राचिन-धार्मिक -आध्यात्मिक जागृत योगगुरूसिद्धपीठ असलेल्या, नवनाथ संप्रदायाच्या श्री गोरक्षनाथ मंदिर अनई येथील मठाचे सेवेकरी अमरनाथ गुरु लहिरीनाथ (पूर्वाश्रमीचे नाव : वामनराव मारोती भागवत महाराज) हे संपूर्ण हयातभर सेवारत असतांना त्यांना सोमवार दि. 30 डिसेंबर 2024 रोजी देवाज्ञा झाली.ही वार्ता पंचक्रोशीत पसरताच हजारो भाविक भक्तांचा मेळा अनई ह्या गावखेड्याकडे मार्गस्थ झाला. मंगळवार दि.31 डिसेंबर 2024 रोजी सिद्ध गुरु रामनाथ महाराज मठ संस्थान रामगाव रामेश्वर ; गुरु शांतिनाथ महाराज रामगाव रामेश्वर इत्यादी संस्थानच्या संतमहंत शिष्य वृदांच्या उपस्थितीत आणि नाथसंप्रदाय व इतर सद्भक्ताच्या उपस्थितीत, वारकरी संप्रदायांच्या हरिभजनाच्या गजरात त्यांना अभ्यंगस्नान घालून,पुजाअर्चना, शंखनाद करीत हजारो भाविकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर दिंडी काढून त्यांना समाधीस्थळी नेण्यात आले.मंत्रोच्चारात महाआरती करून त्यांना साखर समाधी देण्यात आली. स्वामी अभेद्यनाथ गुरु सेवानाथ ; मार्तंडनाथ गुरु अभेद्यनाथ यांनी समाधीसोहळा पार पाडला.व महाराज सद्गुरूचरणी पंचतत्वात विलीन झाले.यावेळी प्रामुख्याने नाथसंप्रदायातील सर्वच मठांची शिष्यमंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.उपस्थितांमध्ये बिजवे ; गजानन बिजवे,साबळे गुरुजी, कृष्णराव गाडगे गुरुजी,गोपिचंद पाटील चौधरी,बलखंडे, बाळकृष्ण काळे,संजय कडोळे, संजय भेंडे,राजीव भेंडे,संकेत नाखले,अजय काळे,संतोष गुल्हाने,कैलाश हांडे इत्यांदीसह हजारो भाविकांची उपस्थिती होती.