चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन संलग्न आयटक ची महत्त्वपूर्ण जिल्हा बैठक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ.विनोद झोडगे यांच्या मार्गदर्शनात तर कॉ.सुहासिनी वाकडे जिल्हा सचिव गट प्रवर्तक कर्मचारी संघटना यांच्या अध्यक्षतेखाली तर कॉ.प्रदीप चीताडे जिल्हा संघटक आयटक, कॉ.निकीता नीर जिल्हा सचिव आशा वर्कर संघटना,मनीषा नंदगिर्वार,सुनंदा मुलमुले यांच्या उपस्थितीत एम.एस. ई.बी.वर्कर्स फेडरेशन सोसायटी हाल चंद्रपूर येथे संपन्न झाली.
. यावेळी जिल्हाभरातील तालुका अध्यक्ष,सचिव,पी.एच.सी.प्रमुख व शहरातील प्रमुख आशा गटप्रर्वत्तकं उपस्थीत होत्या.
आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या लढ्याला यश आले असून सातत्यपूर्ण आंदोलनामुळे आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांना पाच हजार रुपये मानधनात वाढ झाली आहे.
यासाठी १२ फेब्रुवारी ते १ मार्च असे २३ दिवस मुंबई येथे अखंड आंदोलन करण्यात आले.
लढल्याने जिंकता येते हा इतिहास असल्यामुळे आयटक कामगार संघटनेच्या इतिहासावर विश्वास आहे म्हणून अनेक यशस्वी लढे देऊन कामगारांचे प्रश्न सोडविलेले आहेत.
यावेळी अनेक आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी यांनी विविध समस्यांवर चर्चा केली आणि एकजुटीने संघर्ष केल्यामुळे जिंकता येतो असं विश्वास व्यक्त केले. तसेच पुढे शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्या,किमान वेतन लागू करा,सामाजिक सुरक्षा लागू करा,दिवाळी बोनस दोन हजार रुपये द्या व म्हातारपणात जगण्यासाठी मासिक दहा हजार रुपये पेन्शन द्या या मागणीसाठी व पुढील रणनीती ठरविण्यासाठी आशा व गट प्रवर्तक विजयी जिल्हा मेळावा दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 3 वाजता पर्यंत प्रियदर्शनी इंदिरा गांधी सास्कृतिक सभागृह बस स्टँड जवळ चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे तेव्हा या विजयी मेळाव्याला हजारो संख्येने सहभागी व्हा असे आवाहन आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी केले आहे.